जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का


हायलाइट्स:

  • जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या आधीच भाजपला धक्का
  • खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांचा अर्ज बाद
  • निवडणुकीआधीच ६ जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात?

म. टा. प्रतिनिधी । जळगाव

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Jalgaon District Bank Election) अर्ज छाननीमध्ये पुन्हा एकदा भाजपला धक्का बसला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse), विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अर्ज छाननीच्या प्रक्रियेत खासदार रक्षा खडसे, स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरले आहेत. रक्षा खडसेंनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून दाखल केला होता. तर स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून दाखल केला होता.

वाचा: सचिन सावंत यांच्यानंतर नाना पटोलेंचा आणखी एका काँग्रेस नेत्याला धक्का

मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. यामध्ये आता रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची शक्यता असल्याने एकनाथ खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बोदवड मतदारसंघात देखील अॅड. रविंद्र पाटील व रोहिणी खडसे या दोघांचेच अर्ज आहेत. दोघेही राष्ट्रवादीचेच असल्याने रोहिणी खडसे यांनी माघार घेतल्यास अॅड. पाटील बिनविरोध होण्याची शक्यता आहे. रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे.

संतोष चौधरींचा अर्जही बाद

भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाला आहे. त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

सहा जागा महाविकास आघाडीच्या ताब्यात?

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सहा जागा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पारोळा सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे चिमणराव पाटील धरणगाव विकास सोसायटी राष्ट्रवादीचे संजय पवार, एरंडोल येथे सेनेचे अमोल पाटील यानतंर आता अमळनेर राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील, बोदवड अॅड. रविंद्र पाटील तर मुक्ताईनगर सोसायटी मतदारसंघातून एकनाथ खडसे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. भाजपासाठी हा जबर धक्का मानला जात आहे.

वाचा: आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान ऑर्थर रोड जेलमध्ये; काही मिनिटांची भेटSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: