ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद


ठाणे: ठाणे महापालिकेच्या पिसे येथील राँ वाँटर पम्पिंग स्टेशनमध्ये वाढीव पाणीपुरवठा योजनेची यंत्रणा बसवण्यात येणार आहे. तसेच देखभाल दुरूस्तीसाठी स्टेम प्राधिकरणाचा पाणीपुरवठा शुक्रवार, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते शनिवार २३ ऑक्टोबर सकाळी नऊ असा २४ तास बंद राहणार आहे.

या कामामुळे घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जेल, जाँन्सन, इटर्निटी, ब्रह्मांड, विजयनगरी, बाळकूम, कोलशेत, आझादनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, साकेत, रूस्तमजी इ. भागात तसेच कळवा व मुंब्र्याच्या काही भागांत चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पाणी विभागाने केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: