Aryan Khan: आर्यन खानची जामिनासाठी धावाधाव; आता मुंबई हायकोर्टात केला अर्ज


हायलाइट्स:

  • आर्यन खानची जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव.
  • अर्जावरील तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार.
  • विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळलाय जामीन अर्ज.

मुंबई: विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खान याने लगेचच जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आर्यनने जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला असून या अर्जावर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी उद्या आर्यनच्या वकिलांकडून विनंती केली जाण्याची शक्यता आहे. ( Aryan Khan Moves Mumbai High Court )

वाचा: ड्रग्ज पार्टी प्रकरण: आर्यन खानला कोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली आहे. ३ ऑक्टोबर रोजी आर्यनला अटक झाली होती. तेव्हापासून तो कोठडीत आहे. प्रथम त्याला एनसीबी कोठडी झाली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. त्याला सध्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. जामीन मिळावा म्हणून आर्यनची धडपड सुरू आहे. आज विशेष एनडीपीएस कोर्टात आर्यनला जोरदार झटका बसला. जामीन अर्जावर राखून ठेवलेला निर्णय विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आज सुनावला आणि आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा यांचे जामीन अर्जही फेटाळून लावले. त्यामुळे आर्यनला आणखी काही दिवस मन्नत ऐवजी कोठडीतच राहावं लागणार आहे.

वाचा: आर्यन खान प्रकरणाबद्दल विचारताच जावेद अख्तर यांनी केला ‘हा’ सवाल

विशेष एनडीपीएस कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यनच्या वकिलांनी तातडीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाच्या निर्णयानंतर तासाभरातच आर्यनचे वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देत जामिनासाठी अर्ज केला आहे. उद्या आर्यनचे वकील अर्जाविषयी न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर प्राथमिक माहिती देऊन तातडीच्या सुनावणीसाठी तारीख देण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.

वाचा: परमबीर सिंग बेपत्ता; राज्य सरकारनं कोर्टात मांडली ‘ही’ भूमिका

दरम्यान, मुंबईजवळ समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने छापा टाकला होता. या कारवाईत आर्यनसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते व त्यांच्याकडून ड्रग्जही जप्त करण्यात आले होते. चौकशीनंतर आर्यन, अरबाज मर्चंट व मूनमून धामेचा या तीन जणांना प्रथम अटक करण्यात आली व नंतर अन्य पाच जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वाचा:मुंबईत रेस्टॉरंट, दुकाने, इतर आस्थापना रात्री किती वाजेपर्यंत?; पालिकेचा आदेश जारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: