हायलाइट्स:
- आर्यन खानच्या जामिनावर निर्णय येताच नवाब मलिक यांनी घेतली पत्रकार परिषद
- एनसीबीच्या कारवायांवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह
- समीर वानखेडेंचे व्हॉट्सअॅप चॅट चेक करण्याची केली मागणी
मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. रेव्ह पार्ट्यांवर यापूर्वीही अनेकदा कारवाया झाल्या आहेत. त्यावेळी जेव्हा केव्हा संशयित सापडत होते, तेव्हा त्यांचे रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडलं जायचं. त्यानंतर एखाद्याचा नमुना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून कोर्टात हजर केलं जात होतं. त्यानंतर पुढं न्यायालयीन कारवाई सुरू व्हायची. गेल्या वर्षभरात एनसीबीनं अनेकांवर आरोप केले किंवा त्यांना अटक केली, पण त्यांचे रक्ताचे किंवा लघवीचे नमुने कधीही घेतले नाहीत. ज्या आरोपींना ताब्यात घेतलं जात आहे, त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्यानं त्यांची टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर त्यांना आरोपी ठरवलं जात आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानंच नमुने घेतले जात नाहीत,’ असा आरोप मलिक यांनी केला. ‘एनसीबी ही केवळ इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे चालत आहे. समीर वानखेडे यांचा मोबाइल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. त्यांची फोन रेकॉर्डिंग समोर आली तर एनसीबीच्या अनेक कारवाया कशा बोगस आहेत आणि वानखेडे यांनी मुंबईत कोणत्या प्रकारचा फर्जीवाडा केलाय ते समोर येईल, असंही मलिक म्हणाले.
‘भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून मुंबईत दहशत माजवत आहेत. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय. याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
हेही वाचा:
ड्रग्जविषयी आर्यन खानची अभिनेत्रीशी चर्चा; व्हॉट्सअॅप चॅट कोर्टापुढं सादर
राणे, कृपाशंकर, गावित, पाचपुतेंच्या चौकशीचं काय झालं?; NCP चे कार्यकर्ते ईडीच्या दारात
निवृत्त ST कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात आढळला मृतदेह