टी-२० वर्ल्डकपमधील सराव सामन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी याआधी प्रत्येकी एक सराव सामना खेळला आहे. भारताने इंग्लंडविरुद्ध ७ विकेटनी तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध ७ विकेटनी विजय मिळवला आहे. मुख्य स्पर्धेला २३ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून ऑस्ट्रेलियाची लढत पहिल्याच दिवशी आहे. तर भारत पहिली लढत दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांना या लढतीच्या माध्यमातून सरावाची संधी आहे.
वाचा- कोण म्हणतय भारत-पाकिस्तान एक होऊ शकत नाहीत? वर्ल्डकपमध्ये खेळतोय दोघांचा मिळून एक संघ
भारतीय संघ या सामन्यातून फलंदाजीचा क्रम निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. त्याच बरोबर गोलंदाजीत देखील शार्दूल ठाकूर आणि वरुण चक्रवर्ती यांची चाचणी घेतली जाईल. पहिल्या सामन्यात रोहितने विश्रांती घेतली होती आता दुसऱ्या लढतीत विराट कोहलीने विश्रांती घेतली आहे.
वाचा- देशासाठी बाहेर बसण्याची तयारी; खराब फॉर्ममुळे या संघाचा कर्णधाराने घेतली टोकाची भूमिका
असा आहे भारतीय संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर अश्विन, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर आणि वरुण चक्रवर्ती