सहा महिने सुरू होती पोटदुखी; शस्त्रक्रिया करून पोटातून काढला मोबाइल


काहिरा: पोटदुखीचा त्रास असलेल्या एका रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी मोबाइल फोन काढला. पोटदुखीचा त्रास असल्याची तक्रार केल्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णाचा एक्स-रे काढला. या एक्स-रे रिपोर्टमुळे डॉक्टरांना धक्काच बसला. या रुग्णाच्या पोटात मोबाइल असल्याचे दिसून आले. या रुग्णाने सहा महिन्यापूर्वी मोबाइल गिळला होता. मात्र, त्याची वाच्यता कुठेही केली नव्हती. अखेर शस्त्रक्रिया करून हा मोबाइल काढण्यात आला.

इजिप्तमध्ये ही घटना घडली आहे. दक्षिण इजिप्तच्या अस्वान विद्यापीठ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. या रुग्णाने सहा महिन्यांपूर्वी मोबाइल गिळला होता. ही बाब त्याने इतरांपासून लपवून ठेवली होती. नैसर्गिक पद्धतीने शौचावाटे फोन पोटातून बाहेर येईल असे त्याला वाटले होते. मात्र, हा फोन पोटातच अडकून राहिला. त्यामुळे तीव्र पोटदुखी सुरू झाली. त्यानंतर या रुग्णाने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. या रुग्णाचे पोटामध्ये संसर्ग फैलावला असल्याचे एक्स-रे रिपोर्टमध्ये आढळून आले.

पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झाला; शस्त्रक्रियेने काढले एक किलो खिळे, नट बोल्ट!
धक्कादायक! लैंगिक समस्येने त्रस्त व्यक्तीने कापले स्वत:चे लिंग
लैंगिक संबंधादरम्यान संमतीशिवाय निरोध काढण्यास बंदी ; चर्चेत आहे ‘हा’ कायदा

प्राण गमावण्याचा होता धोका

मोबाइल फोन सहा महिन्यांपासून पोटात असल्यामुळे पोटाच्या अतंर्गत भागात जखमा झाल्या होत्या. तात्काळ उपचार केले नसते तर या रुग्णाला प्राण गमवावे लागले असते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करून पोटातून मोबाइल फोन काढला. पोटात अडकलेल्या मोबाइलमुळे शरिरात अन्न जाण्याचा मार्ग काहीसा बंद झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: