कोण म्हणतय भारत-पाकिस्तान एक होऊ शकत नाहीत? वर्ल्डकपमध्ये खेळतोय दोघांचा मिळून एक संघ


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपला युएई आणि ओमान येथे सुरुवात झाली आहे. मुख्य स्पर्धा २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, त्याआधी पात्रता फेरीतच्या लढती सुरू आहेत. स्पर्धेत सर्वांना प्रतिक्षा आहे ती २४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीची. सोशल मीडियावरून दोन्ही देशांच्या चाहत्यांनी आतापासून आपआपल्या संघांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा मिळून एक संघ सध्या खेळत आहे. जाणून घेऊया त्याच्या बद्दल…

वाचा- एका व्यक्तीमुळे भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरण बदलले; या खेळाडूने केला मोठा खुलासा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षापासून द्विपक्षीय क्रिकेट बंद आहे. त्यामुळेच जेव्हा जेव्हा आयसीसीच्या स्पर्धेत या दोन संघात सामने होतात तेव्हा एक खेळ मैदानावर सुरू असतो आणि दुसरी लढाई चाहत्यांच्यात सोशल मीडियावर सुरू असते. जाहिरातदार देखील याची संधी सोडत नाही. त्यामुळेच मौका मौकाच्या जाहिरातील मोठी प्रसिद्ध मिळते. पण अशा सर्वांना एका संघाने चोख उत्तर दिले आहे. हा संघ म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यापासून तयार झालेला संघ म्हणावा लागले.

वाचा- India vs Australia: विराटला आज अखेरची संधी; भुवीऐवजी शार्दूल खेळणार?

टी-२० वर्ल्डकप स्पर्धा या वर्षी भारतात होणार होती. पण करोनामुळे त्याचे आयोजन युएई आणि ओमान येथे होत आहे. या स्पर्धेचे आयोजक भारत म्हणजे बीसीसीआय आहे. सध्या पात्रता फेरीत खेळत असलेला ओमानच्या संघातील पाच खेळाडूंचा जन्म भारतातील तर सहा खेळाडूंचा जन्म पाकिस्तानमधील आहे. या अर्थाने हा संघ म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशांपासून तयार झालेला संघ म्हणावा लागले.

वाचा- इंग्लंडवरील विजयानंतर भारताचे टेन्शन वाढले; पाकविरुद्धच्या सामन्यात घ्यावा लागेल मोठा

ओमान संघातील भारतात जन्मलेले खेळाडू

जतींदर सिंग (लुधियाना)
के प्रजापती (गुजरात)
संदीप गौड (हैदराबाद)
अयान खान (भोपाळ)

ओमान संघातील पाकिस्तान जन्मलेले खेळाडू

बिलाल खान (पेशावर)
फयाज भट्ट (सियालकोट)
मोहम्मद नदीम (सियालकोट)
नसीन खुशी (सियालकोट)

या शिवाय काही खेळाडू आहेत जे भारत आणि पाकिस्तानमध्ये जन्मलेले आहेत. ओमानने पहिल्या सामन्यात पापुआ न्यू गिनीला १० विकेट राखून पराभूत केले होते. त्यानंतर काल झालेल्या लढतीत त्याचा बांगलादेशने पराभव केला. आता पुढील लढतीत विजय मिळवल्यास त्यांना सुपर १२ चे तिकिट मिळू शकते. ग्रुप बी मध्ये गुणतक्त्यात ते दुसऱ्या स्थानावर असून त्याचे नेट रनरेट बांगलादेशपेक्षा चांगले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: