ड्रग्जविषयी आर्यन खानची अभिनेत्रीशी चर्चा; व्हॉट्सअॅप चॅट कोर्टापुढे


हायलाइट्स:

  • आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज दुपारी निर्णय
  • आर्यनच्या विरोधात नवे पुरावे कोर्टात सादर
  • नव्या पुराव्यांमुळं आर्यनच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन (Aryan Khan) यांच्या जामिनावर आज न्यायालय निर्णय देणार आहे. त्याआधीच नवी माहिती समोर आली आहे. आर्यन खान व एका नवोदित अभिनेत्रीमध्ये ड्रग्जबाबत चर्चा झाल्याचा पुरावे एनसीबीला मिळाले आहेत. हे पुरावे एनसीबीनं न्यायालयात सादर केले आहेत. ‘इंडिया टूडे’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

वाचा: LIVE आर्यन खानच्या जामिनावर आज निर्णय; NCB ची भूमिका महत्त्वाची ठरणार

मुंबईहून गोव्याकडं निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी ड्रग पार्टी झाली होती. त्या पार्टीवर छापा टाकून एनसीबीनं एकूण १४ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यात आर्यन खानचा समावेश आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे. त्याच्या वतीनं प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे व अमित देसाई युक्तिवाद करत आहेत. याआधीच्या सुनावणीच्या अंती न्यायालयानं २० ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज दुपारी विशेष एनडीपीएस कोर्टाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील हे निकाल सुनावणार आहेत. तत्पूर्वी, महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

वाचा: ‘मुंद्रा बंदरात पकडलेल्या अब्जावधीच्या ड्रग्जची बातमी का येत नाही?’

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी दरम्यान आर्यन खान व एका नवोदित अभिनेत्रीमध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. त्या चर्चेचे व्हॉट्सअॅप चॅट एनसीबीनं मागील सुनावणीच्या वेळी कोर्टासमोर सादर केल्याचं आता समोर आलं आहे. याशिवाय, काही ड्रग्ज पुरवठादारांसोबत झालेल्या आर्यन खानच्या संभाषणाचे पुरावे देखील एनसीबीनं सादर केले आहेत. हे मुद्दे आजच्या सुनावणी दरम्यान पुढं येण्याची शक्यता असून त्यामुळं एकूण प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

आर्यन खान व अन्य आरोपी सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. कोठडीच्या काळात आर्यनसह अन्य आरोपींचं समुपदेशन करण्यात आल्याचंही सांगितलं जातं.

वाचा: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; सायनमधून २१ कोटींचे ड्रग्ज जप्तSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: