पॅरिस: जगभरात करोना महासाथीच्या आजाराचा जोर कमी झाला असल्याची परिस्थिती दिसत असताना दुसरीकडे काही देशांमध्ये पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढू लागली आहे. फ्रान्समध्येही बाधितांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाच्या पाचव्या लाटेचा धोका निर्माण झाला असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
फ्रान्समध्ये २४ तासांमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या १५ वरून ६४८३ इतकी झाली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये ३३ हजार ४९७ करोनाबाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्याच्या आकडेवारीशी तुलना करता रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या बाधितांच्या तुलनेत ही संख्या पाचपटीने कमी आहे. ब्रिटनमध्येही करोनाचा संसर्ग वाढत आहे.
भारतीय पाणबुडी आमच्या हद्दीत शिरली; पाकिस्तानचा कांगावा, व्हिडिओ जारी
रशियातही करोना महासाथीचा संसर्ग वाढत आहे. रशियात सोमवारी १०१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. करोनासाथ सुरू झाल्यापासूनचा हा उच्चांकी आकडा आहे. देशातील बळींची एकूण संख्या दोन लाख २५ हजार ३२५ झाली आहे.
अमेरिकेत कामगारांचा एल्गार; कारखान्यांपासून ते हॉलिवूड स्टुडिओपर्यंत संपाची धग
रशियात अजूनही लसीकरणाने म्हणावा तसा वेग पकडलेला नाही; तसेच सरकारही निर्बंध अधिक कडक करण्यास तयार नाही. देशातील १४.६० कोटी नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. हे प्रमाण सुमारे ३२ टक्के आहे. त्यामुळे लॉकडाउन केले जाणार नाही, असे राष्ट्रपती कार्यालयाने म्हटले.
Source link
Like this:
Like Loading...