आता पुढे काय?
तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत सोने विक्रमी पातळी गाठू शकते. अमेरिकेची आर्थिक आकडेवारी आणि क्रूडच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची चिंता सोन्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करू शकते. या व्यतिरिक्त, सण-उत्सव, लग्नाचा हंगाम देखील सोन्याच्या किंमतीला धक्का देऊ शकतो. चीनमध्ये सुरू असलेल्या वीज संकटामुळे इक्विटी गुंतवणूकदार गुंतवणुकीासाठी आपला मोर्चा सोन्याकडे वळवू शकतात. पण अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किमतीवर दबाव राहण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ९ हजार रुपयांनी स्वस्त झाले सोने
आज जरी सोन्याच्या किमतीत वाढ दिसत असली तरी बऱ्याच दिवसांनी सोने सुमारे ९ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने ५६,२०० रुपयांच्या आपल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते आणि आता सोने प्रति १० ग्रॅम ४७,४०० रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. अशा प्रकारे सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा सुमारे ९ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही खरेदीची चांगली संधी आहे.