… म्हणून भावना गवळी ईडी चौकशीसाठी हजर राहणार नाहीत


हायलाइट्स:

  • शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचे समन्स
  • चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दिले होते आदेश
  • मात्र, भावना गवळी आज चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत

मुंबईः शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी दुसरे समन्स बजावले होते. आज बेलार्ड पीयर भागातील प्रादेशिक संचालनालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आज भावना गवळी ईडी चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत.

भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली आहे. त्यामुळं त्यांनी चौकशीसाठी ईडीकडे १५ दिवसांची मुदत मागितली आहे. अशी माहिती त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी दिली आहे. त्यामुळंच त्या आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नाहीत.

ट्रस्टमधील गैरव्यवहारप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलं होतं. याआधी याआधी ४ ऑक्टोबर रोजी त्यांना समन्स बजावण्यात आले होते.पण, अन्य प्रशासकीय कामकाज असल्याचे सांगत त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या. आजही ईडी चौकशीला त्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं गैरहजर राहणार आहेत. तसं पत्रही भावना गवळी यांच्याकडून ईडीला देण्यात आलं आहे.

वाचाः ‘ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच राज्यात करोना आटोक्यात’

काय आहे प्रकरण?

खासदार भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. याअंतर्गत ‘ईडी’ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर ‘ईडी’ने या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली आहे. ‘ईडी’तील सूत्रांनी सांगितले, ‘गवळी यांच्या ट्रस्टमध्ये सईद खान हे संचालक आहेत. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रुपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालयातदेखील गैरव्यवहार झाला. एकूण घोटाळा १८ कोटी रुपयांचा आहे. शिवाय सात कोटी रुपये रोख रकमेचादेखील गैरवापर करण्यात आला, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. त्यासंबंधी अधिक चौकशीसाठीच गवळी यांना समन्स बजावण्यात आले आहे.’

वाचाः आर्यन खानच्या सुटकेसाठी भाजप आमदाराची प्रार्थना; शुभेच्छाही दिल्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: