India vs Australia: विराटला आज अखेरची संधी; भुवीऐवजी शार्दूल खेळणार?


दुबई: पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडवर मात करून भारतीय संघाची टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपच्या तयारीची सुरुवात मनासारखी झाली. आता अंतिम सरावासाठी भारतीय संघाची आज (बुधवार) ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत होत आहे. या सराव सामन्यात फलंदाजीचा क्रम निश्चित करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. त्यानंतर २४ ऑक्टोबरला भारताची पाकिस्तानविरुद्ध लढत होत आहे. हा वर्ल्ड कप कर्णधार म्हणून विराट कोहलीचा आणि प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा अखेरचा वर्ल्ड कप आहे. तेव्हा सर्वोत्तम तयारीसह भारतीय संघाचा मैदानात उतरण्याचा प्रयत्न असेल.

वाचा- इंग्लंडवरील विजयानंतर भारताचे टेन्शन वाढले; पाकविरुद्धच्या सामन्यात घ्यावा लागेल मोठा निर्णय

पहिले तीन फलंदाजीचे क्रम निश्चित असल्याचे कोहलीने आधीच स्पष्ट केले आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल ही जोडी सलामी येणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोहली स्वत: येईल. अर्थात, ईशान किशनने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात सलामीला येऊन ७० धावांची खेळी केली. आपणही सलामीसाठी चांगला पर्याय असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असतो. मात्र, गरजेनुसार ऋषभ पंतला वरच्या क्रमांकावर संधी दिली जाते. तेव्हा त्याचा फलंदाजीचा क्रम काय असेल, याबाबत उत्सुकता आहे. रोहित इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात खेळला नव्हता. आता बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खेळणार. आता प्रश्न आहे तो हार्दिक पंड्याचा. पंड्या इंग्लंडविरुद्ध फलंदाजीस आला खरा; पण तो सहजतेने खेळताना दिसला नाही. पंड्या गोलंदाजी करीत नाही. तेव्हा भारतीय संघाचा ‘थिंक टँक’ त्याच्याबाबतीत काय विचार करीत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्यामुळे भारताचा गोलंदाजीतील सहावा पर्यायही गमावतो आहे. भुवनेश्वरकुमार, महंमद शमी आणि जसप्रीत बुमराह हे भारताचे तीन प्रमुख गोलंदाज आहेत. भारताकडे शार्दूल ठाकूर हादेखील एक चांगला अष्टपैलू पर्याय आहेच. फिरकी गोलंदाजांमध्ये मात्र रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, वरुण चक्रवर्ती यांच्यात मोठी स्पर्धा असेल. २०१६च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ ७२ टी-२० सामने खेळला आहे. यातील ४५ सामने भारताने जिंकले आहेत.

वाचा-टी-२० वर्ल्डकप खेळणाऱ्या संघावर धक्कादायक आरोप; भारताला घाबरून पराभूत झाले

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडवर तीन विकेटनी मात केली. अर्थात, ऑस्ट्रेलियाला चिंता आहे ती डेव्हिड वॉर्नरच्या फॉर्मची. तो न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अॅडम झाम्पा आणि केन रिचर्डसन यांनी गोलंदाजीच चमक दाखविली. ऑस्ट्रेलिया संघालाही अंतिम अकरा निश्चित करण्याची ही अखेरची संधी असेल.

वाचा- टी-२० वर्ल्डकपमध्ये इतिहास घडला; आजवर कोणालाही जमला नाही हा विक्रम

यातून होणार संघ निवड : भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, महंमद शमी, शार्दूल ठाकूर.

वाचा- T20 World Cup: भारताविरुद्ध काय असेल पाकिस्तानची रणनिती; झाला मोठा खुलासा

ऑस्ट्रेलिया – अॅरन फिंच (कर्णधार), अॅश्टन एगर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

सामन्याची वेळ : सायंकाळी ३.३० पासूनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: