आर्यन खानच्या सुटकेसाठी भाजप आमदाराची प्रार्थना; ट्वीट करत दिल्या शुभेच्छा


हायलाइट्स:

  • आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज फैसला
  • आर्यन खानच्या सुटकेसाठी भाजप नेत्याची प्रार्थना
  • ट्विट करत दिल्या शुभेच्छा

मुंबईः अमली पदार्थ प्रकरणात ३ ऑक्टोबरपासून अटकेत असलेला सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची जामिनावर सुटका होणार की नाही, याचा फैसला आज होणार आहे. आर्यन खानच्या (aryan khan) अटकेवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच आता भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी प्रार्थना केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी सलग काही ट्वीट करत आर्यन खानला जामीन मिळावा अशी मागणी केली आहे. तसंच, ठाकरे सरकारवरदेखील निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राम कदम म्हणतात. ‘प्रार्थना आहे की आज आर्यन खानला जामीन मिळावा. संविधान अन् कायद्याप्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एका व्यक्ती विशेषच्या विरोधातील लढाई नाही. अखंड मानव जातीची ड्रग्स विरोधी लढाई आहे,’ असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

‘अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकार निदान या खतरनाक ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज माफियाच्या विरोधात उभे राहतील. मात्र वसूलीचा प्रभाव स्पष्ट दिसला. मेहबूबा मुफ्ती यांनी देखील आगामी निवडणुकीसाठी याचा पुरेपुर उपयोग केला. जी ड्रग्जची नशा आपल्या सर्व युवकांना बरबाद करु शकते त्या विरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र का येऊ शकत नाही. हे दुःख आहे,’ असं राम कदम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाचाः ‘ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच राज्यात करोना आटोक्यात’

‘आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत, गरीब, नेता, अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्व समान आहेत. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्जचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्जच्या विरोधात प्रखर लढाई उभी करुन युवकांना ड्रग्जपासून दूर करण्यासाठी काम करुन संकटाचे संधीत रुपांतर करण्यासाठी एक देशवासिय या नात्याने शुभेच्छा,’ असंही राम कदम यांनी म्हटलं आहे.

वाचाः कोळसा संकट कायम; साठ्यात दोन टक्क्यांची वाढ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: