क्रांतिवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार करमुसे यांना प्रदान
पंढरपूर दि.20/10/2021 - महापुरुषांच्या चरित्रामधुन लढण्याची प्रेरणा मिळते, असे उद्गार ठाणे येथिल शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे प्रमुख कार्यकर्ते अनंत करमुसे यांनी काढले. पंढरपूरातील थोर क्रांतिकारक, गोवा मुक्ति संग्रामातील अग्रणी, क्रांतिवीर वसंत बाबाजी बडवे यांच्या 36 व्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. क्रांतिवीर वसंत दादा बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कार करमुसे यांना यावेळी प्रदान करणेत आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रदेश हिंदुसभेचे अध्यक्ष अनिल पवार होेते.आशिर्वाद देणेसाठी ह.भ.प.ओंकार संतोष बाबा,वडगावकर महाराज, रामकृष्ण महाराज वीर उपस्थित होते. यावेळी हिंदुसभेचे जेष्ठ नेते अनिलकाका बडवे, अभयसिंह इचगावकर, विवेक बेणारे, बाळाराव डिंगरे, प्रशांत खंडागळे, दिपक कुलकर्णी,पंडित भोले पुणेकर, शाम हिवरकर, गणेश लंके, मयुर बडवे, श्रीराम बडवे, महेश खिस्ते, तुकाराम चिंचणीकर, सौरभ थिटे पाटील आणि शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होतेे.
प्रथम क्रांतिवीर वसंत दादा बडवे ट्रस्टचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी हा पुरस्कार देण्यामागची भुमिका विषद केली. राज्यामधे जी मंडळी हिंदुत्वाचे लढावू काम करतात त्यांना दादांच्या नावाचा शौर्य पुरस्कार श्री विठोबाचा आशीर्वाद म्हणून प्रदान करण्यात येतो. याआधी दैनिक सनातन प्रभात,मिलींद एकबोटे ,संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर,हिरामण अप्पा गवळी,विकास सुर्यवंश,समिर दरेकर, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालीक, सुप्रसिध्द कन्नड साहित्यीक म्हैसुरचे एस्.एल.भैरप्पा, धनसिंंह सुर्यवंशी, अभय वर्तक, चंद्रकांत सहासने,शिवशंकर स्वामी, अधिवक्ता संजीव पुनाळेकर,संजय साळुंखे, गोरक्षक सुधाकर बहिरवाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .
अनंत करमुसे यांनी राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करावयास राज्य शासनाला भाग पाडले होते .यावेळी महाराज मंडळींनी आशिर्वाद दिले.
यानंतर क्रांतिवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्काराचे वितरण मान्यवरांचे हस्ते करणेत आले. शाल, श्रीफळ, हार, मानपत्र आणि 11 सहस्त्र रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार देताना छ. शिवाजी महाराजांचा उदघोष करणेत आला. यावेळी त्यांच्या धर्मपत्नी निवेदिता करमुसे यांचाही सत्कार माजी नगरसेविका वैष्णवी बेणारे आणि वसुजा कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना करमुसे म्हणाले की, मी भिंडे गुरुजींचा शिष्य आहे. त्यांनीं आम्हाला छ. शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराजांची चरित्रे सांगुन आमचा पिंड घडविला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लढण्याची प्रेरणा मिळते. आव्हाड यांना मी उत्तर दिले याकरीता त्यांनी माझी पाठ सोलून काढली.पण मी घाबरलो नाही तर लढण्याचा निश्चय केला.आव्हाड यांचेवर केस करुन त्यांना अटक करणेसाठी भाग पाडले. यामधे देशासाठी काम केलेल्या सर्व महापुरुषांचीच प्रेरणा आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विवेक बेणारे यांनी केले. गीत गायनाचे काम तुकाराम चिंचणीकर यांनी केले. आभार मयुर बडवे यांनी मानले. यावेळी मुलतः कॅथालिक गोवेनिज ख्रिश्चन असुन श्री विठ्ठल भक्तिमुळे 35 वर्षांपुर्वी हिंदु धर्म स्विकारलेले आणि दिनदलित वर्गात हिंदुत्वाची पताका सदैव तेवती ठेवलेले ह.भ.प. ओंकार बाबा यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास हिंदुत्वनिष्ठ नागरिक उपस्थित होते.