सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करताहेत – शरद कोळी

गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी असलेला विभागच अवैध गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय
 पंढरपूर /प्रतिनिधी - शासन बंदी असतानासुद्दा सोलापूर जिल्ह्यात सर्वञ खुलेआमपणे अवैद्य गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे .गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणीची जबाबदारी असलेला विभागच या अवैद्य गुटखा विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने जिल्ह्यातील हजारो तरूण युवक व्यसनाधीन बनत आहेत. गुटखा सेवनाने अनेक तरूणांना कॅन्सर आजाराने ग्रासले आहे . काहींना आपला जीव गमवावा लागला आहे , अशी गंभीर परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात आहे. 

  या अवैध गुटखा विक्रीस शासनाने पायबंद घालण्यासाठी कडक कायदा अमलात आणला असताना यासंबधी स्वतंञ विभाग असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी अशा संवेदनशील परिस्थितीतही हप्तेखोरी करून अवैध गुटखा विक्रीवर एखादी किरकोळ कारवाई करत असल्याचा आरोप धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी यांनी केला आहे. तसेच येत्या 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात अवैद्य गुटखा विक्री आढळुन आल्यास त्यास संबधित अधिकारी यांच्यावर प्रथम कारवाई करावी अशी मुंबई हायकोर्ट येथे जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी एका प्रसिद्धी पञकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: