दीपक कलढोणे यांच्या शास्त्रीय गायन व अभंगवाणी ने पंढरपूरकर रसिक मंत्रमुग्ध

दीपक कलढोणे यांच्या शास्त्रीय गायन व अभंगवाणी ने पंढरपूरकर रसिक मंत्रमुग्ध
 पंढरपूर /मनोज पवार - कै.पुरूषोत्तम काका खडके यांच्या चतुर्थ मासिक संगीत सभेचे पुष्प पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य दीपक कलढोणे यांच्या सुमधूर स्वरांनी गुंफले.यावेळी सुरुवातीला कै.पुरूषोत्तम खडके यांच्या प्रतिमेच पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. नंतर दीपक कलढोणे यांच्या गायनाला सुरुवात झाली. सुरूवातीला शास्त्रीय गायनात राग मारव्यामध्ये विलंबित एकतालात ख्याल गायल्या नंतर बंदिश. तराणा राग शिवरंजनी,मंदरवा आयो,एक सुर चराचर छायो,अनंता तुला कोण पाहू शके,अवघे गर्जे पंढरपूर ,शेवटी ,कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कार्यक्रमाची सांगता केली.

या गायनाला तबला साथ प्रसाद कुलकर्णी, हार्मोनियम निरज कलढोणे ,तानपूरा वर्धराज मिर्जी,अरूण भुजबळ व वैभव केंगार , टाळसाथ भैय्या मनमाडकर यांनी केली.यावेळी निरंजन महाराज मनमाडकर यांनी देवीभग्वतकथा सादर केल्याबद्दल व ज्ञानेश्वर दुधाणे यांना कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल  रसिकांच्यावतीने सत्कार  करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमे निमत्ताने खडके परिवाराच्या वतीनं सुगंधी दुधाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाऊ मनमाडकर. भैय्या मनमाडकर, शुभांगी ताई मनमाडकर, माधुरीताई जोशी,डॉ.मिलिंद जोशी, प्रवीण खडके, ज्ञानेश्वर दुधाणे यांच्यासह संगीत रसिकांच्यावतीनं करण्यात आले होते.

पुढील मासिक संगीत सभा १९ नोव्हेंबर रोजी अपर्णाताई बनवसकर यांची होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: