आटपाडी तालुक्याला जिल्हा बँकेचे दुसरे संचालकपद मिळावे – सादिक खाटीक, प्रा.एन. पी. खरजे यांची मागणी
आटपाडी दि १९ /१०/२०२१, प्रतिनिधी - वसंतदादा दुध संघाचे चेअरमन, आटपाडी तालुक्याचे ज्येष्ट नेते विष्णूपंत चव्हाण पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे आटपाडी तालुक्या साठीचे दुसरे संचालकपद मिळावे अशी भावना त्यांना शुभेच्छा देताना सादिक खाटीक, प्रा एन पी खरजे यांनी व्यक्त केली .
पश्चिम भागाचे नेते खरसुंडीचे माजी सरपंच, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन शशिकांत देठे आणि आटपाडी तालुक्याचे दिवंगत ज्येष्ट नेते, दिघंचीचे धोंडीसाहेब देशमुख यांच्या धर्मपत्नी श्रीमती चंद्रभागामाई देशमुख यांच्या रुपाने आटपाडी तालुक्याला जास्तीचे संचालक पद मिळाले होते . बॅकेच्या आजवरच्या इतिहासात फक्त दोनच वेळा जास्तीचे संचालकपद आटपाडी तालुक्याला मिळाले असून आताच्या निवडणूकीत जास्तीच्या दुसऱ्या संचालकपदासाठी आटपाडी तालुक्याचा प्राधान्याने विचार केला जावून तालुक्याला आणखी एक संधी श्रेष्ठींनी द्यावी अशी अपेक्षा विष्णूपंत चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खाटीक ,खरजे यांनी बोलून दाखविली .
विष्णूपंत चव्हाण पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त यप्पावाडी येथे फेटा बांधून पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन करत राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग प्रदेश महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादी युवक कांग्रेस प्रदेश सचिव प्रा .नारायण खरजे यांच्या हस्ते पंताना सन्मानीत करण्यात आले .
यावेळी युवा नेते रणजित चव्हाण-पाटील, सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर होळे, सुखदेव खताळ, नवनाथ खरजे , वसंतदादा पाटील सेवा प्रतिष्ठानचे तालुका प्रतिनिधी असिफ खाटीक, सलीम वंजारी आदी उपस्थित होते.