Coronavirus In Maharashtra: दिवाळीआधी राज्यात दिलासादायक चित्र; करोना रुग्णसंख्येत वेगाने होतेय घट


हायलाइट्स:

  • राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • दिवसभरात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान.
  • सक्रिय रुग्णांची संख्या २६ हजारपर्यंत आली खाली.

मुंबई: राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आली असून दैनंदिन रुग्णसंख्या आता दीड हजारापर्यंत खाली घसरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ७९१ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९७.४२ टक्के एवढे आहे तर मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )

वाचा: मुंबईत रेस्टॉरंट व दुकाने रात्री किती वाजेपर्यंत?; पालिकेचा आदेश जारी

राज्यात कोविडची दुसरी लाट ओसरत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे दैनंदिन मृत्यूंचे प्रमाणही कमी झाले आहे. ही स्थिती लक्षात घेत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथील करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसारच रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर दुकाने व इतर आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिवाळी आधी हे सकारात्मक चित्र दिसत असतानाच आजची आकडेवारी हाती आली असून त्यात नवीन बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिकच राहिली आहे. राज्यात आणखी ४९ रुग्ण आज करोनाने दगावले असून मुंबईत चार मृत्यू झाले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २६ हजारपर्यंत खाली आली आहे.

वाचा:करोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी राजेश टोपे यांचं अत्यंत सावध विधान

करोनाची राज्यातील स्थिती

– आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ % एवढा आहे.
– दिवसभरात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान.
– आज २ हजार ७९१ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आजपर्यंत एकूण ६४,२४,५४७ करोना बाधित रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२% एवढे.
– एकूण ६,१२,४८,८२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९४,८२० (१०.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात २,०९,७९८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर ९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
– राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या सध्या २६ हजार ८०५ इतकी.

मुंबईतील गेल्या २४ तासांतील स्थिती

बाधित रुग्ण- ३१३
बरे झालेले रुग्ण- ५११
बरे झालेले एकूण रुग्ण- ७२८१३८
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ९७%
एकूण सक्रिय रुग्ण-४६५०
दुप्पटीचा दर- १२८० दिवस
कोविड वाढीचा दर (१२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर)- ०.०५ %

वाचा: महाराष्ट्रात पुढचं सरकार कुणाचं असेल?; शरद पवार यांनी केलं मोठं विधानSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: