ज्या कारने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडलं गेलं, ती कार आशिष मिश्रा चालवत असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांनी लखीमपूरला जाऊन पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आता या घटनेत मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या समर्थनासाठी आवाजही उठवला जात आहे. आतापर्यंत यूपी पोलिसांची कारवाई एकतर्फी होती. ज्यांनी आमच्या लोकांची हत्या केली त्यांना का पकडलं जात नाहीए, असा सवाल त्यांनी केला आहे.
priyanka gandhi vadra : ‘उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस ४० टक्के महिलांना उमेदवारी
लखीमपूर हिंसाचार घटनेची चौकशी एसआयटी करत आहे. पोलिसांनी ६ फोटो जारी केले आहेत. या घटनेशी संबंधित सर्व व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर पोलिसांनी हे फोटो जारी केले आहेत. यातील काही जण हातात लाठ्या -काठ्या घेऊन दिसतात. तर काही जण रागात बोट दाखवताना दिसतात. त्याचवेळी काही लोक धावताना दिसतात. या फोटोंमध्ये सुमारे ३०-३५ चेहरे दिसत आहेत. बहुतेक जण तरुण आहेत आणि दोन, चार वृद्ध देखील आहेत. एका फोटोत जीप पेटताना दिसतेय.
डीआयजींसह ५ पोलिस अधिकाऱ्यांचे क्रमांक जारी करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फोन करून आरोपींची माहिती देता येईल. हे मोबाइल क्रमांक 9454400454, 9454400394, 9454401072, 9454401486 आणि 9450782977 आहेत. लखीमपूर घटनेच्या दोन्ही बाजूने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या वतीने सुमित जयस्वाल एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.