हायलाइट्स:
- ऑनलाईन जुगार अड्ड्यांची पोलखोल
- पोलिसांनी दिवसभर केली छापेमारी
- तब्बल ३३ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल
सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना या लॉटरी सेंटरवर लॉटरीच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अश्विनकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे आणि पोलीस पथकाने या सर्व ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत ऑनलाइन लॉटरीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. यावेळी सेंटरवर सर्रासपणे जुगार खेळवला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.
शहरातील रेल्वे स्टेशन रोड, जनता मार्केट, जुना मोंढा परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी अवैध धंदा करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर परभणी शहरात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.