चंद्रकांत पाटील PM मोदींचाही एकेरी उल्लेख करत असावेत; जयंत पाटलांचा टोला


हायलाइट्स:

  • वादात आता जयंत पाटील यांनीही घेतली उडी
  • शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना लगावला टोला
  • सोन्याचा मुकुट बक्षीस म्हणून देण्याच्या घोषणेवरूनही केली टीका

सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर सुरू झाल्यानंतर वादात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतली आहे. सांगलीत माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना (NCP Jayant Patil Criticizes BJP Chandrakant Patil) टोला लगावला आहे.

‘सत्ता गेल्यानंतर काही लोकांमध्ये भ्रमिष्टपणा येतो, तर काही लोकांचा तोल जातो. चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत यातलं काय झालं आहे, हा संशोधनाचा विषय आहे. राजकारणात एकेरी भाषा वापरणं ही महाराष्ट्रची संस्कृती कधीच नव्हती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी एकेरी भाषा वापरली, हे दुर्दैवी आहे. शरद पवार यांचे बोट धरून आपण राजकारणात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. मग चंद्रकांत पाटील तरी शरद पवारांना एकेरी भाषा कसे वापरू शकतात? बहुतेक चंद्रकांत पाटील हे खासगीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पण एकेरी भाषेत वापरत असावेत. त्यांना तशी सवय असावी,’ असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

‘…तर मी आमदारकीचा राजीनामा देतो’; गंभीर आरोपानंतर रवी राणांनी दिलं खुलं आव्हान

सांगली जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

सत्ता गेल्यानंतर काही लोकांमध्ये भ्रमिष्टपणा येतो, तर काही लोकांचा तोल जातो. चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत यातलं नेमकं काय झालंय, हा संशोधनाचा विषय आहे, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली. चंद्रकांत पाटील हे खासगीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही एकेरी उल्लेख करत असावेत. तशी त्यांना सवय असावी, असा टोलाही मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

दरम्यान, जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात राजकीय धक्का देणाऱ्या भाजपच्या नेत्याला सोन्याचा मुकुट देण्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र तशी वेळ येणार नसल्याची खात्री असल्यानेच चंद्रकांत पाटील यांनी सोन्याचा मुकुट घेण्याचे जाहीर केले. सोन्याच्या मुकुटाची ते केवळ चर्चाच करीत राहतील, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: