काँग्रेसकडे फक्त २ आमदार आणि महिलांना ४० टक्के उमेदवारी देणार?
उत्तर प्रदेशमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत भाजपच्या मोठ्या संख्येत महिला आमदारही निवडून आल्या. २०१२ च्या निवडणुकीत यूपीत ३६ महिला आमदार झाल्या होत्या. तर २०१२ मध्ये ४० महिला निवडून आल्या होत्या. यातील सर्वाधिक ३४ महिला आमदार या भाजपच्या आहेत. बसपा आणि काँग्रेसच्या फक्त २-२ महिला आमदार आहेत. २०१७ च्या निवडणुकीत यूपीत ४४५ महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
काँग्रेससमोर दुसरं मोठं आव्हान हे महिलांमध्ये मोठे चेहरे फार नाहीत. यूपी काँग्रेसमध्ये काही मोजक्याच महिलांची नावं समोर येतात. वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी यांची कन्या आराधना मिश्रा ‘मोना’, आदिती सिंह आणि सुप्रीया श्रीनेत अशी इतर नावं आहेत.
उत्तर प्रदेशात काँग्रेसकडे फक्त दोन महिला आमदार आहेत. यात आराधना मिश्रा मोना आणि आदिती सिंह यांचा समावेश आहे. यातील आदिती सिंह यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. तर उन्नावरमधील काँग्रेसच्या माजी आमदार अनु टंडन यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.