बांगलादेशचा संघ जरी पात्रता फेरी खेळत असला तरी तो स्कॉटलंडच्या तुलनेत ताकतीचा संघ मानला जातो. अशात बांगलादेशच्या पराभवावार अनेक जण शंका उपस्थित करत आहेत. बांगलादेशचा संघ भारताला घाबरून जाणीपूर्वक पराभूत झाला, असे अनेक जण बोलत आहेत.
वाचा- विराटची मोठी डोकेदुखी गेली; पाकिस्तानविरुद्ध ही जोडी उतरणार सलामीला
टी-२० वर्ल्डकपची सुरूवात पात्रता फेरीच्या लढतीने झाली आहे. आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले असून यातील प्रत्येकी दोन संघ सुपर १२ मध्ये प्रवेश करतील. बांगलादेशचा संघ ग्रुप बी मध्ये आहे. या ग्रुपमधील नंबर एकचा संघ हा मुख्य स्पर्धेतील ग्रुप बीमध्ये जाईल. तर दुसऱ्या क्रमांकाच संघ ग्रुप ए मध्ये जाईल. ग्रुप बी मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे संघ आहेत. युएईच्या मैदानावर आशियाई संघासमोर बांगलादेश कमकूवत पडू शकतो अशी त्यांनी भिती वाटते. यासाठी त्यांना पात्रता फेरीतील ग्रुप बी मध्ये दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. यासाठीच त्यांनी पहिल्या लढतीत जाणीवपूर्वक पराभूत झाल्याचा आरोप केला जातोय.
डाव उलटा पडू शकतो
जर बांगलादेशने ग्रुप बी मध्ये येण्याचे टाळण्यासाठी असे केले असेल तर त्याचा डाव उलटा पडू शकतो. पात्रता फेरीत बांगलादेशच्या ग्रुपमध्ये ओमानचा संघ देखील आहे. ओमानने पहिल्या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा पराभव केला होता. जर ओमानने बांगलादेशचा पराभव केल्यास ते सुपर १२ मध्ये पोहोचू शकणार नाहीत.
वाचा- टी-२० वर्ल्डकपमध्ये इतिहास घडला; आजवर कोणालाही जमला नाही हा विक्रम
या संघांवर देखील झालेत आरोप
१९९२च्या वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड संघावर अशा प्रकारचा आरोप करण्यात आला होता. न्यूझीलंडने सलग ७ साखळी सामने जिंकले होते. अखेरची लढत पाकिस्तानविरुद्ध होती. ही लढत त्यांनी जिंकली असती तर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढावे लागले असते. तर पराभूत झाले असते तर त्यांना घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळावे लागले असते. न्यूझीलंडचा अखेरच्या साखळी सामन्यात पराभव झाला. त्यानंतर पाकने पुन्हा सेमीफायनलमध्ये त्यांचा पराभव केला आणि फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ते विजेते झाले.
अशाच प्रकारचा आरोप दक्षिण आफ्रिकेच्या संघावर देखील झालाय. २००७च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये आफ्रिकेची मॅच भारताविरुद्ध होती. भारताचा पराभव झाला असता तर ते स्पर्धेच्या बाहेर झाले असते. उटल आफ्रिका जिंकली असती तर सेमीफायनलमध्ये त्याची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली असती. त्या वर्षी ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा असे म्हटले गेले होते की आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल खेळायची नव्हती. भारताने साखळी फेरीत आफ्रिकेचा इतक्या मोठ्या अंतराने पराभव केला की ते स्पर्धेबाहेर झाले.