भाजपचे १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात; शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट


मुंबईः आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा, पदधिकाऱ्यांची बैठक, नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. शिवसेना व भाजपनंही मुंबई महापालिकेची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं रणनिती आखायला सुरुवात केली आहे. तर, शिवसेनेनंही भाजपला शह देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे १५ ते २० नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसेना- भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. डिसेंबरमध्ये याबाबत घोषणा होईल, असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

वाचाः घरगुती भांडणातून पतीने स्वतःच्याच घराला लावली आग; आजूबाजूची दहा घरंही जळून खाक

शिवसेनेच्या या दाव्यावर भाजपनं पलटवार केला आहे. भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेना दिवसाढवळ्या स्वप्न बघतेय. आश्रय योजनेत १, ८४४ कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर शिवसेनेनं हा दावा केला आहे. शिवसेनेला पहिले घोटाळ्याचे स्पष्टीकरण द्यावे, असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः … तर मलिकांच्या जावयाप्रमाणे शेतकरी श्रीमंत होईल; माजी मंत्र्यांचे शरद पवारांना पत्र

तसंच, मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही, असं म्हटलं आहे. शिवसेना भ्रष्टाचाराचे आरोप लपवण्यासाठी मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

वाचाः प्रा. राजन शिंदे यांच्या खुनाचा उलगडा; अल्पवयीन मुलानेच केली हत्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: