इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली नाही. त्याच बरोबर संघातील आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार सर्वात महाग ठरला. या दोन खेळाडूंसह सूर्यकुमार यादव अद्याप लयीमध्ये आलेला दिसत नाही. हार्दिक पंड्या सराव सामन्यात गोलंदाजी करताना दिसेल असे वाटले होते. पण विराटने फक्त पाच गोलंदाजांचा वापर केला. हार्दिक गोलंदाजी करणार नाही असे चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. पण मुख्य गोलंदाज भुवीचा फॉर्म हा भारतासाठी अधिक काळजीचा आहे. तो आयपीएलमधील फॉर्ममध्ये कायम आहे. आयपीएलमध्ये भुवी आउट ऑफ फॉर्म होता. भारताच्या पुढील सामन्यात भुवीच्या जागी शार्दुलला संधी मिळू शकते.
वाचा- विराटची मोठी डोकेदुखी गेली; पाकिस्तानविरुद्ध ही जोडी उतरणार सलामीला
हार्दिक पंड्याने मोठ्या कालावधीत गोलंदाजी केली नाही. आयपीएलमध्ये देखील त्याने एकही ओव्हर टाकलेली नाही. त्यामुळे एक फलंदाज म्हणून त्याला संघात संधी दिली जाईल का? कारण त्याच्या मुळे संघात एक गोलंदाज कमी पडतोय. अशा परिस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन शार्दुल ठाकूर किंवा रविंद्र जडेजाच्या नावाचा विचार करू शकते. हे दोघेही गोलंदाजी सोबत फलंदाजी देखील करू शकतात.
वाचा- सराव सामना पडला महागात; टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला बसला मोठा झटका
भुवनेश्वरने इंग्लंडविरुद्ध चार षटकात ५४ धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. भुवीची धिमी गोलंदाजी आणि बिघडलेली लय भारतीय संघाची काळजी वाढू शकते. यामुळे विराट कोहली नव्या कॉम्बिनेशनचा विचार करू शकतो.