लखीमपूर खीरी हिंसाचार : भाजप नेता सुमित जयस्वालसहीत चार जणांना अटक


हायलाइट्स:

  • लखीमपूर खीरी हत्याकांडात एकूण १० आरोपी अटकेत
  • फरार भाजप नगरसेवक सुमित जयस्वाल पोलिसांच्या ताब्यात
  • सुमित जयस्वालसहीत चार जणांना अटक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलिसांनी लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात आणखीन चार आरोपींना अटक केलीय. यामध्ये एका भाजप नेत्याचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याच्या आरोपाखाली भाजप नेते सुमित जयस्वाल याच्यासाहीत एसयूव्ही गाडीत असलेल्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुमित जयस्वाल हा भाजपचा स्थानिक नेता आणि नगरसेवक आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्यानंतर अपघातग्रस्त गाडीतून उडी टाकून पळ काढताना सुमित जयस्वाल व्हिडिओत कैद झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुमित जयस्वाल फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

प्रत्यक्षदर्शींनीही सुमित जयस्वाल यांच्याविरोधात साक्ष दिली होती. या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आणि मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला ९ ऑक्टोबर रोजी १२ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १० जणांना अटक करण्यात आलीय.

सुमित जयस्वाल याच्याशिवाय शिशुपाल, नंदन सिंह बिष्ट आणि सत्य प्रकाश त्रिपाठी अशा चार आरोपींना लखीमपूर खीरी पोलिसांनी आणि क्राईम ब्रान्चच्या टीमनं अटक केलीय. सत्य प्रकाश त्रिपाठी याच्याकडून लायसन्सधारक बंदूक आणि तीन काडतुसंही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आर्यन खान अटक प्रकरण : ‘एनसीबी’ विरोधात शिवसेना न्यायालयात
amit shah : राष्ट्रीय सुरक्षेवर अमित शहांची ६ तास चालली बैठक, दिले महत्त्वाचे निर्देश
उल्लेखनीय म्हणजे, सुमित जयस्वाल याच्याकडून उलट अज्ञात शेतकऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. यात मारहाण करत गाडीचा चालक, मित्र आणि भाजपच्या दोन साथीदारांच्या हत्येचा आरोप शेतकरी आंदोलकां विरोधात सुमितनं केला होता. शेतकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आल्यानं चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याखाली शेतकरी आल्याचा दावाही सुमितनं केला होता.

तसंच आपण घटनास्थळी नव्हतो तर कार्यक्रमाच्या आयोजन स्थळी होतो, असा दावाही अगोदर सुमित जयस्वाल यानं केला होता. मंत्रीपुत्र आशिष मिश्रा यानंही आपण घटनास्थळावर नव्हतो तर दोन किलोमीटर दूर अंतरावर आपल्या गावात असल्याचा दावा केला होता.

लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात एका स्थानिक पत्रकाराचाही नाहक बळी गेला होता. तर इतर तिघांची अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेल्या मारहाणीनंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांवर करण्यात आला होता.

३ ऑक्टोबर रोजी घडलेल्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणानं देशभरात खळबळ उडाली होती.

Satya Pal Malik: ‘मी राज्यपाल असताना श्रीनगरमध्ये घुसण्याची दहशतवाद्यांची हिंमत नव्हती’
2 girls run over by vehicle : पोलीस अधिकाऱ्याने दोन तरुणींना चिरडलं, १ ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैदSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: