विराटची मोठी डोकेदुखी गेली; पाकिस्तानविरुद्ध ही जोडी उतरणार सलामीला


दुबई: टी-२० वर्ल्डकपमधील सराव सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ विकेटनी पराभव केला. या सामन्यातील विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असेल त्याच बरोबर कर्णधार विराट कोहलीची मोठी डोकेदुखी संपली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धावांचा मोठा पाठलाग करताना भारताला इशान किशन आणि केएल राहुल यांनी चांगली सुरूवात करून दिली.

वाचा- टी-२० वर्ल्डकपमध्ये इतिहास घडला; आजवर कोणालाही जमला नाही हा विक्रम

सराव सामन्यात रोहित शर्मा खेळला नसला तरी वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची जोडी कोण असेल हे विराट कोहलीने सामन्याच्या आधीच स्पष्ट केले. भारताची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडीच सलामीवीर म्हणून उतरेल. तर स्वत: विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.

आयपीएलमध्ये खराब फॉर्ममध्ये असलेल्या ईशान किशनने अखेरच्या काही लढतीत तुफान फलंदाजी केली होती. तो फॉर्म त्याने कायम राखला आहे. इंग्लंडविरुद्ध ईशानने ४६ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. आयपीएलमध्ये त्याने अखेरच्या २ डावात ८४ आणि नाबाद ६० धावा केल्या होत्या.

वाचा- टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक पराभव; पाहा भारतीय संघावर काय परिणाम होणार

केएल राहुलने देखील आयपीएलमधील फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ७ टी-२० सामन्यात ३ अर्धशतक केली आहेत. इतक नव्हे तर प्रत्येक सामन्यात त्याने २० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या होत्या. आता इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने फक्त २४ चेंडूत ५१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

रोहितचा फॉर्म

राहुल आणि इशान किशन हे दोन फलंदाज फॉर्ममध्ये असले तरी विराटसाठी एक काळजीचा विषय आहे. तो म्हणजे रोहित शर्माची फलंदाजी. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रोहितने ६ टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी एकाही डावात त्याला ५० धावा करता आल्या नाहीत. अखेरच्या चार सामन्यात त्याला फक्त एका सामन्यात २० पेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत. पण टी-२० मध्ये शानदार रेकॉर्ड असलेल्या रोहित शिवाय भारत पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार नाही. यामुळेच ईशान किशनला सलामीवीर म्हणून संधी मिळणार नाही. रोहित शर्मा पुढील म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात खेळणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: