एक प्रभाग तीन सदस्य निवडणूक पद्धतीच्या विरोधात आणि शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची नुकसानभरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसाठी उद्या दि. 20 ऑक्टोबर रोजी राज्यभर रिपाइं चे आंदोलन – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.19 /10/2021 - एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकार ने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू करू नये. एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लोकशाहीला घातक आहे.एक व्यक्ती एक मत एक मूल्य या संकल्पनेला छेद देणारी पद्धत आहे त्यामुळे एक प्रभाग तीन सदस्य या पद्धतीला तीव्र विरोध करण्यासाठी आणि राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची नुकसानभरपाई द्यावी, दलित अत्याचार रोखण्यासाठी ऍट्रोसिटी कायद्यातील तरतुदिंची तंतोतंत अंमलाबाजवणी करावी, महिलांवरील अत्याचार रोखावेत ,अत्याचार पीडित महिलांना राज्य सरकार ने 50 लाख रुपयांची मदत द्यावी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी उद्या दि.20 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व तहसील कचेरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करणार असल्याची घोषणा ना.रामदास आठवले यांनी आज जाहीर केली.
रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करताना कोरोना प्रसार होऊ नये याची दक्षता घेत मास्कचा वापर करीत नियमांचे पालन करून आंदोलन करण्याची सूचना ना.रामदास आठवले यांनी केली आहे.