Inflation: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत नागरिक विकत घेतायत टोमॅटो!


नवी दिल्ली :पेट्रोल डिझेल, गॅसच्या किंमतींसहीत महागाईनं सामान्यांना जेरीस आणलंय. आता, दरदिवसाच्या जेवणातील भाज्यांनीही उच्चांक गाठल्याचं समोर येतंय. काही शहरांत जवळपास प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळून येणारा टोमॅटो विकत घेण्यासाठी नागरिकांना पेट्रोल-डिझेलची किंमत मोजावी लागत असल्याचं दिसून येतंय.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा टोमॅटो उत्पादक देश

देशातील वेगवेगळ्या शहरांत ५० रुपयांपासून ते जवळपास ९३ रुपयांपर्यंत टोमॅटोच्या किंमती आढळून येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, चीननंतर भारत हा जगातील सर्वाधित उत्पादन घेणारा देश आहे.

पिकांचं नुकसान

देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय. बाजारपेठांमध्ये माल पोहचण्यासाठी झालेल्या नुकसानीमुळे टोमॅटोच्या किंमतीत वाढ झालीय. टोमॅटोचं पुढचं उत्पादन आता दोन – तीन महिन्यांनी बाजारात येण्याची शक्यता आहे.

Kerala Rain: केरळमध्ये दहा धरणांसाठी ‘रेड अलर्ट’
petrol and diesel : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यावरून केंद्र सरकारमध्ये खल
किरकोळ बाजारातील किंमती

कोलकाता शहरातील किरकोळ बाजारात टोमॅटोच्या किंमती ९३ रुपये किलोपर्यंत पोहचल्या आहेत. ही किंमत जवळपास डिझेलच्या सध्याच्या किंमतींच्या बरोबरीत आहे.

तर, चेन्नई शहरातही सोमवारी टोमॅटो ६० रुपये किलो दराने मिळत असल्याचं दिसून आलं.

राजधानी दिल्लीत टोमॅटो ५९ रुपये किलो तर आर्थिक राजधानी मुंबईत ५३ रुपये किलोपर्यंत किंमती पोहचल्या आहेत.

ग्राहक मंत्रालयाकडून देशातील १७५ शहरांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत ५० हून अधिक शहरांत ग्राहकांना एक किलो टोमॅटोसाठी ५० रुपयांहून अधिक किंमत मोजावी लागत असल्याचं समोर आलंय.

घाऊक बाजारातील किंमती

इतकंच नाही तर घाऊक बाजारातही टोमॅटोची किंमत अधिक असल्याचं दिसून येतंय. कोलकातातील घाऊक बाजारात टोमॅटो ८४ रुपये, चेन्नईत ५२ रुपये, मुंबईत ३० रुपये आणि दिल्लीत २९.५० रुपये किलो दरानं उपलब्ध होत आहेत.

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किंमतीनंतर आता स्वयंपाक घरावरही महागाईचा परिणाम दिसून येणार, हे आता स्पष्ट आहे

लखीमपूर खीरी हिंसाचार : भाजप नेता सुमित जयस्वालसहीत चार जणांना अटक
yogi adityanath dussehra aarti : कॅमेऱ्याला दाखवत मुख्यमंत्री योगींनी केली दसऱ्याची पूजा? व्हायरल व्हिडिओवरून रंगलं राजकारण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: