दुबई : इंग्लंडच्या संघाला यावेळी भारताच्या सलामीवीरांनीच जोरदार तडाखा दिल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुल आणि इशान किशन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढत संघाला ८.२ षटकांत ८२ धावांची दणकेबाज सलामी दिली. या दमदार सलामीच्या जोरावरच भारताने इंग्लंडवर सात विकेट्स राखून मोठा विजय साकारला.
इंग्लंडल्या १८९ धावांचा पाठलाग करताना भारताला लोकेश राहुल आणि इशान किशन यांनी धडाकेबाज सुरुवात करुन दिली. राहुलने सुरुवातीपासूनच दणदणीत फटकेबाजी करायला सुरुवात केली. राहुलने या सामन्यात २४ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५१ धावांची आक्रमक खेळी साकारली. राहुलला यावेळी इंग्लंडच्या मार्क वुडने मोइन अलीकरवी झेलबाद केले. राहुल बाद झाला तर इशान किशन हा इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत असल्याचे पाहायला मिळाले. इशानला यावेळी निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. इशानने यावेळी ४६ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७० धावांची दमदार खेळी साकारली. इशान किशन निवृत्त झाल्यावर रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे खेळपट्टीवर होते. पण सूर्यकुमार आठ धावांवर बाद झाला, त्यानंतर रिषभ पंत आणि हर्दिक पंड्या यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडल्या जॉनी बेअरस्टोने धडाकेबाज फलंदाजी करत भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच सचामार घेतला. पण दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन विकेट्स मिळवत भारतासाठी दमदार कामगिरी केली. जॉनीचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. जॉनीने यावेळी ३६ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४९ धावा केल्या, त्यामुळेच इंग्लंडला भारतापुढे १८९ धावांचे आव्हान ठेवता आले. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोवने दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा आजच्या सामन्यात चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. जॉनीला यावेळी लायम लिव्हिंगस्टोनची चांगली साथ मिळाली. लायमने यावेळी २० चेंडूंत चार चौकार आणि एका षटाकारच्या जोरावर ३० धावा केल्या. जॉनी आणि लायम बाद झाल्यावर मोइन अलीने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मोइनने यावेळी २० चेंडूंत चार चौकार आणि दोन षटाकारांच्या जोरावर नाबाद ४३ धावांची दणदणीत खेळी साकारली.
Source link
Like this:
Like Loading...