InvITs म्हणजे काय? जाणून घ्या गुंतवणूक संधी आणि कसा फायदा मिळवता येईल


हायलाइट्स:

  • इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) म्युच्युअल फंडाप्रमाणे असतात.
  • वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करून परताव्याच्या स्वरूपात उत्पन्नाचा एक छोटा हिस्सा मिळवू शकतात.
  • InvITs म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसारखे काम करतात.

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आपल्या पहिल्या खाजगी पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट (InvIT) च्या माध्यमातून पाच ते सहा हजार कोटी रुपये जमा करण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. या गुंतवणूकदारांमध्ये कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIB) आणि ओंटारियो म्युनिसिपल एम्प्लॉइज रिटायरमेंट सिस्टम (OMERS) यांचा समावेश आहे. इन्व्हिटद्वारे (InvIT) सरकारी मालकीच्या उपक्रमाद्वारे मालमत्ता कमाईची ही पहिली वेळ असेल.

पैशांची गरज आहे? या दोन बचत योजनांवर मिळेल तुम्हाला कर्ज, जाणून घ्या सविस्तर
InvITs म्हणजे काय?
इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) म्युच्युअल फंडाप्रमाणे असतात. ज्याद्वारे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार कमी गुंतवणूक करून परताव्याच्या स्वरूपात उत्पन्नाचा एक छोटा हिस्सा मिळवू शकतात. InvITs म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसारखे काम करतात.

मोठ्या पडझडतीतून सावरले; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने-चांदी
InvIT ट्रस्ट म्हणून स्थापिक केली जाऊ शकतात आणि सेबीकडे नोंदणीही केली जाऊ शकते. InvITमध्ये चार गोष्टींचा समावेश होतो : १) विश्वस्त (ट्रस्टी) २) प्रायोजक ३) गुंतवणूक व्यवस्थापक ४) प्रकल्प व्यवस्थापक.

तेजीचा धडाका! सेन्सेक्सची ५०० अंकाची झेप, गुंतवणूकदार एक लाख कोटींनी श्रीमंत
विश्वस्त InvIT च्या कामगिरीवर लक्ष ठेवतात. हे सेबीद्वारे प्रमाणित केले जाते. तो प्रायोजक किंवा व्यवस्थापकाचा सहकारी असू शकत नाही. प्रायोजक ते लोक आहेत, जे १०० कोटी रुपयांच्या भांडवलासह कोणत्याही संस्थेला किंवा कॉर्पोरेट घटकाला प्रमोट आणि रेफर करू शकतात. इन्व्हेस्टमेंट मॅनेजर ही एक मर्यादित दायित्व भागीदारी (Limited Liability Partnership- LLP) करणारी संस्था आहे, जी InvITच्या मालमत्ता आणि गुंतवणुकीचे पर्यवेक्षण करते. प्रोजेक्ट मॅनेजर ही अशी व्यक्ती आहे, जी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते आणि ज्याचे काम पीपीपी प्रकल्पांच्या बाबतीत प्रोजेक्टची अंमलबजावणी करणे आहे.

एसी रेल्वेपेक्षा विमान प्रवास होणार स्वस्त; आजपासून १०० टक्के आसन क्षमतेने उड्डाणे
भांडवल उभारणीसाठी InvIT कशी मदत करते?
इन्व्हिट (InvIT) इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सना दीर्घकालीन पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये (इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस) पडलेल्या भांडवलाचा पुनर्वापर करण्यास मदत करतात. या प्रकल्पांमध्ये रस्ते, ट्रान्समिशन लाइन किंवा नूतनीकरणयोग्य मालमत्तांचा समावेश आहे. इक्विटी व्यतिरिक्त InvITs दीर्घकालीन कर्ज वाढवण्यास मदत करतात.

InvIT मध्ये कोण गुंतवणूक करू शकतो?
२०१९ मध्ये भांडवली बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने इन्व्हिट्स (InvITs) आणि आरईआयटीमध्ये (REITs) गुंतवणुकीची किमान मर्यादा कमी केली होती, ज्यामुळे ते अधिक सुलभ झाले होते. आरईआयटीसाठी किमान सबस्क्रिप्शन मर्यादा ५० हजार रुपये करण्यात आली. InvITs साठी ते १० लाख रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आले आहे. इन्व्हिट इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतात. वाहतूक, ऊर्जा, दळणवळण इत्यादी क्षेत्रात हे प्रकल्प असू शकतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: