नवी दिल्लीः काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले वाढले आहेत. दहशतवाद्यांनी सामन्य नागरिकांना हल्ल्यांचे लक्ष्य केले आहे. यामुळे पार्श्वभूमीवर टी-२० वर्ल्डकपमध्ये होणारा भारत-पाकिस्तान सामना रद्द (
india vs pak match ) करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीवर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजीव शुक्ला यांनी काश्मीरमधील हत्यांचा निषेध केला आहे.
काश्मीरमध्ये हत्या झालेल्या नागरिकांच्या पीडित कुटुंबीयांची राजीव शुक्ला यांनी सांत्वना केली आहे. तसंच शोक व्यक्त केला आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये नागरिकांच्या केलेल्या हत्यांचा निषेध करतो, असं राजीव शुक्ला म्हणाले. तसंच त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावरही भूमिका स्पष्ट केली. ICC सोबतच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार हे सामने खेळवले जातात. यामुळे आपण कुठल्या एका देशाबरोबर सामना खेळण्यास नकार देऊ शकत नाही. ICC ची स्पर्धा खेळावी लागेल, असं राजीव शुक्ला म्हणाले.
काश्मीररमध्ये दहशतवाद्यांनी बिहारच्या २ मजुरांची हत्या केली. याचा निषेध बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच भारत-पाक टी-२० सामना रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही केली. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
india vs pak match : भारत-पाक T-20 सामना होणार का? आता बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणाले…
भारत-पाक सामना २४ ऑक्टोबरला होणार
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान २४ ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा सामना दुबईत खेळवला जाणार आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत पाकिस्तानचा पराभव केला आहे.
amit shah : अमित शहांचे ऑपरेशन काश्मीर; ८ तास मॅरेथॉन बैठका, NSA डोवलही उपस्थित राहणार
Source link
Like this:
Like Loading...