राज्यातील वाहतूकदारांना कर सवलत मिळणार?; मुख्यमंत्री म्हणाले…


हायलाइट्स:

  • राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
  • आर्थिक दिलासा देण्याची मुख्यमंत्र्यांकडं केली मागणी
  • मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढू; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई: कोविडमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील वाहतूकदारांच्या मागण्यांवर लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढला जाईल. वित्त व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश देण्यात येतील,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. (Representatives of state transport union meets cm Uddhav Thackeray)

महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स बस वाहतूक महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली व चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदींची उपस्थिती होती .

राज्यातील शहरांमध्ये बसेस व ट्रक्स यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील व मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात देखील नियोजन करण्यास त्यांनी सांगितले.

कोविडमुळे वाहतूकदार आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे वार्षिक मोटार वाहन करात सूट मिळणे, व्यवसाय करात सूट मिळणे, शाळा व धार्मिक स्थळांच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा मोटार कर पूर्ण माफ करणे, राज्यभरात वाहने व बसेस थांबण्यासाठी पार्किंग जागा उपलब्ध करणे, कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसेसची कर कमी करणे, जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत १० ते १६ तास करण्यात आलेली प्रवेश बंदी उठविणे, कालबाह्य प्रलंबित वाहतूक केसेस रद्द करणे, सार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करणे अशा मागण्या महासंघाने केल्या. या बैठकीला वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, उपाध्यक्ष महेंद्र लूले, सरचिटणीस दयानंद नाटेकर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: