रवी शास्त्री आता नवीन भूमिकेच्या शोधात ; ‘या’ दोन पर्यायांचा करणार विचार


मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक आणि वरिष्ठ पुरुष संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक यासह ५ पदांसाठी अर्ज मागविले आहेत, पण ही प्रक्रिया फक्त औपचारिकता मानली जात आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड हाच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होईल. टी-२० विश्वचषकानंतर द्रविड रवी शास्त्रींची जागा घेईल, यावर शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे.
शास्त्रींनी गेल्या १५ वर्षात भारतीय संघासोबत चार वेगवेगळे टप्पे पूर्ण केले आहेत. ते दोन वेळा मुख्य प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. शास्त्रींच्या जवळच्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, टी-२० विश्वचषकासह कार्यकाळ संपल्यानंतर रवी शास्त्री आयपीएल कोचिंग किंवा कॉमेंट्रीमध्ये भूमिका बजावू शकतो. एक क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर शास्त्री बराच काळ कॉमेंट्री करत होते. एकेकाळी त्यांचा आवाज चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाला.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, “३ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत फलंदाजी प्रशिक्षक (टीम इंडिया – वरिष्ठ पुरुष) पदासाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक (दोन्ही टीम इंडिया – वरिष्ठ पुरुष) पदासाठी ३ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. एनसीए (NCA) सह प्रमुख क्रीडा विज्ञान आणि औषध (Head Sports Science and Medicine) या पदासाठीचे अर्ज ३ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ पर्यंत सादर करावेत.

प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे, असा पात्रता निकष ठेवण्यात आला आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मे २०२२ मध्ये ६० वर्षांचे होतील. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण डिसेंबरमध्ये ५९ वर्षांचे होतील. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड सध्या ५३ वर्षांचे आहेत. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर ५१ वर्षांचे आहेत. या सर्व व्यक्ती अर्ज करण्यास पात्र आहेत, पण असे मानले जाते की, राठोड वगळता इतर कुणीही त्यांचे अर्ज प्रशिक्षक पदांसाठी पाठवणार नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: