गृह कर्ज घेताय ;जाणून घ्या कोणत्या बँंकांनी कमी केलेत व्याजदर आणि जाहीर केल्या सवलती


हायलाइट्स:

  • दिवाळीच्या हंगामात खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
  • यात प्रामुख्याने बँकांनी गृहकर्जाशी संबंधित सवलत योजनांची घोषणा केली आहे.
  • बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाच्या दरात ०.३५ टक्के कपात केली आहे.

मुंबई : दिवाळीच्या हंगामात खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यात प्रामुख्याने बँकांनी गृहकर्जाशी संबंधित सवलत योजनांची घोषणा केली आहे. बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाच्या दरात ०.३५ टक्के कपात केली आहे. त्याचबरोबर बँकेने वाहन कर्जाचा दर ०.५० टक्क्याने कमी केला आहे.

बँक ऑफ इंडीयाने जारी केलेल्या निवेदनानुसार बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर आता ६.५० टक्के झाला आहे. यापूर्वी तो ६.८५ टाळले होता. तर वाहन कर्जाचा दर ६.८५ टक्के इतका कमी करण्यात आला आहे. यापूर्वी वाहन कर्जाचा दर ७.२५ टक्के होता.

सुधारित व्याजदर १८ ऑक्टोबर २०२१ पासून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटलं आहे. नव्यानं कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना या सवलतीच्या कर्ज दराचा लाभ घेता येईल, असे बँकेने म्हटलं आहे. त्याशिवाय बँकेने गृह कर्ज आणि वाहन कर्जावरील प्रक्रिया शुल्क देखील पूर्णपणे माफ केले असल्याचे जाहीर केले आहे.

नुकताच बँक आॅफ बडोदाने कर्ज दर कमी केला होता. बँकेकडून सर्वच शाखांतून उपलब्ध असलेल्या बडोदा होम लोन आणि कार लोनवर ०.२५ टक्क्याची सूट देण्यात आली आहे. त्याशिवाय ही बँक होम लोनवर प्रक्रिया शुल्कातही सूट देते आहे. आता होम लोनचा दर ६.७५ टक्के तर कार लोनचा दर ७ टकक्यां * पासून पुढे आहे असे बँकेने म्हटलं आहे.

बाजारात सध्या बँकाकडून देण्यात येणारा विशेष कर्जदर
– भारतीय स्टेट बँकेचा गृह कर्जाचा दर ६.७ टक्क्यापासून सुरु.
– पंजाब नॅशनल बँकेचा गृह कर्जदर ६.७५ टक्क्यांपासून आहे.
– येस बँकेकडून ६.७० टक्के दराने गृहकर्ज मिळू शकते.
– कोटक महिंद्रा बँकेकडून ६.५० टक्के इतक्या कमी दराने गृह कर्ज दिले जात आहे.
– आयसीआयसीआय बँकेकडून ६.७० टक्के दराने गृह कर्ज दिले जाते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: