धोनीने पंतला फलंदाजीचे दिले धडे
धोनीने रिषभ पंतला फलंदाजीच्या युक्त्या सांगितल्या. या खेळाडूने आयपीएल २०२१ मध्ये खेळलेल्या १६ सामन्यांमध्ये ३४.९१ च्या सरासरीने ४१९ धावा केल्या, पण यूएईत झालेल्या दुसऱ्या टप्प्यात तो ८ सामन्यात फक्त एक अर्धशतकच करू शकला. एवढेच नाही, तर आयपीएल २०२१ मध्ये पंतचा स्ट्राईक रेट फक्त १२८ होता.
ईशान किशनसाठीही आयपीएल २०२१ काही विशेष राहिले नाही. किशनने १० सामन्यांमध्ये २६.७७ च्या सरासरीने २४१ धावा केल्या. त्यातही तो आयपीएलच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करू शकला. ईशानने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ५० आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ८४ धावा केल्या. पण चांगल्या फॉर्मशी झगडणाऱ्या ईशानला धोनीच्या एखाद्या टीप्सचा नक्कीच फायदा होईल.
पंड्याला आहे धोनीची गरज
हार्दिक पंड्याला एम.एस. धोनीची खूप गरज होती आणि धोनीनेही त्याच्यासोबत बराच वेळ घालवला. पंड्या आयपीएल २०२१ मध्ये १२ सामने खेळला आणि फक्त १४.११ च्या सरासरीने १२७ धावा करू शकला. सध्या हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नाही, पण तो या टी-२० विश्वचषकात फिनिशरची भूमिका निभावणार आहे. आजच्या सराव सत्रात धोनीने पंड्याशी या भूमिकेबद्दल बोलले असावे.
दुसरीकडे, धोनीने जसप्रीत बुमराहसोबतही बराच वेळ घालवला. या गोलंदाजाने आयपीएल २०२१ मध्ये २१ विकेट्स घेतल्या, पण यूएईच्या लेगमध्ये बुमराह खूप महागडा ठरला. यामुळेच धोनी त्याच्याशी बोलताना दिसला.