अमेरिकेत कामगारांचा एल्गार; कारखान्यांपासून ते हॉलिवूड स्टुडिओपर्यंत संपाची धग


वॉशिंग्टन: अमेरिकेत सध्या अनेक ठिकाणी कामगार-कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तर, काही ठिकाणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. कामगारांनी विविध मागण्यांसाठी संपाची, आंदोलनाची हाक दिली आहे. तर, काही ठिकाणी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने संप टळले आहेत. या संपाची, आंदोलनाची धग विविध कारखान्यांपासून हॉलिवूड स्टुडिओपर्यंत जाणवली आहे.

करोना महासाथीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. तर, दुसरीकडे कुशल कर्मचारी, कामगारांची कमतरता अनेक आस्थापनांना जाणवू लागली आहे. त्यामुळे अनेक कारखाने, आस्थापनांना आपल्या अटींवर कामगारांना काम करण्यास भाग पाडता येत नाही. त्याचा फायदा आता कामगार संघटनांनी घेतला असल्याचे विश्लेषकांनी म्हटले.

ओहायोमधील जॉन डिएरे कंपनीतील शेकडो कामगारांनी मागील आठड्यात विविध मागण्यांसाठी निदर्शने केली. नोकरीच्या अटींमध्ये कंपनीकडून एकतर्फी बदल करण्यात येत होता. त्याला कामगारांनी कडाडून विरोध केला. या कारखान्यातील कामगार ख्रिस लॉरेसन यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, सध्याची परिस्थिती कामगारांसाठी, त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.

महागाईशी झुंजणाऱ्या श्रीलंकेसमोर मोठे संकट; भारताकडे मागितली ‘ही’ मदत!
एक्सियोस.कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी, कामगारांच्या संपामुळे हॉलिवूड स्टुडिओपासून देशातील विविध ठिकाणचे कारखान्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे करोना महासाथीनंतर अर्थव्यस्थेला गती मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरता असल्याने अनेक कंपन्यांनी कामगारांच्या मागण्या केल्या आहेत.

हॉलिवूडमधील ६० हजार कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कामगार संघटनेने सोमवारपासून आंदोलनावर जाण्याची घोषणा केली. वेतन वाढ, स्टुडिओमध्ये कामगार, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा आदी मागणी करण्यात आली होती. हॉलिवूड स्टुडिओ व्यवस्थापनाने युनियनसोबत या मागण्यांच्या अनुषंगाने करार केला आहे. त्यामुळे संप टळला आहे. हा संप झाला असता तर अमेरिकेतील फिल्म आणि टीव्ही स्टुडिओतील कामकाज ठप्प झाले असते.

चिंताजनक! जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण, पाकिस्तान, बांगलादेशनंतर क्रमांक

खाद्यपदार्थांचे उत्पादन करणाऱ्या किलॉगमध्येही कामगारांनी संप पुकारला होता. चांगल्या सुविधांसाठी आणि इतर मागण्यांसाठी १४०० हून अधिक कामगार, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्याशिवाय कामाचे आउटसोर्सिंग ही बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. किलॉगमध्ये जवळपास ५० वर्षांनी संप पुकारण्यात आला होता.

अबब! रेस्टॉरंटमधील जेवणाचे बिल तब्बल ३८ लाख रुपये
अनेक कंपन्यांनी सुरुवातीला कठोर, आडमुठी भूमिका घेतली होती. त्यांनी संप टाळण्याचा प्रयत्न केला नव्हता असे विश्लेषकांनी म्हटले. त्यामुळे कामगारांनी नाइलाजाने संप पुकारला. तर, कामगार संघटनांनी म्हटले की, करोना महासाथीच्या काळात कंपन्यांनी शेअर बाजारातून मोठी कमाई केली. मात्र, त्यांनी कामगारांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले. वेतन वाढ व इतर प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: