amit shah : अमित शहांचे ऑपरेशन काश्मीर; ८ तास मॅरेथॉन बैठका, NSA डोवलही उपस्थित राहणार


नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मॅरेथॉन ( amit shah to chair intelligence bureau’s meet ) बैठक घेणार आहेत. दुपारी २ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंतपर्यंत म्हणजे सलग आठ तास ते स्वतंत्र बैठकांना उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेच्या वार्षिक सभेला ते आधी संबोधित करतील. या बैठकीत देशाच्या विविध राज्यांचे पोलीस महासंचालक (DGP) आणि महानिरीक्षक (IG) यांच्यासह गुप्तचर विभागाचे प्रमुखही उपस्थित राहतील. निमलष्करी दलाचे प्रमुखही यात सहभागी होतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल हे देखील दुपारी २ वाजता सुरू होणाऱ्या या बैठकीला उपस्थित राहतील.

‘राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदे’ची ही वार्षिक बैठक आहे. पण यावेळी परिषदेची ही बैठक महत्त्वाची ठरली आहे. कारण जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रणनीती बदलत सामान्य नागरिकांची आणि स्थलांतरितांच्या हत्या सुरू केल्या आहेत. दहशतवाद्यांनी तिथे १३ दिवसांत ११ नागरिकांची हत्या केली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये होत असलेल्या या हत्यांसह चीन आणि बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे.

दहशतवाद्यांवर चौफेर हल्ला

जम्मू -काश्मीरमधील ताज्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा यांनी ही मोहीम राबवण्यासाठी दिल्लीहून काश्मीरला एक टीम पाठवली आहे. ही स्पेशल टीम दहशतवाद्यांवर काळ बनून कोसळेल. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे जवान दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत आणि त्यांना ठार करत आहेत. दुसरीकडे एनआयएचे पथक दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळत आहे. गुप्तचर विभागाकडून त्यांना माहिती दिली जात आहे. या माहितीवरून दहशतवाद्यांच्या भूमिगत साथीदारांवर आणि अड्ड्यांवर छापे टाकण्यात येत आहेत.

kulgam terror attack : काश्मीरमध्ये बिहारच्या मजुरांवर दहशतवाद्यांचा हल्ला; दोन ठार, तर एक जखमी

pulwama encounter : पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, PSI अर्शीद यांच्या

कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार अमित शहांची भेट

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज गृहमंत्री शहा यांची भेट घेणार आहेत. भाजप कॅप्टनसोबत काम करण्यास तयार असल्याचं बोललं जातंय. यासाठी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर एकमत होणं गरजेचं आहे. कदाचित आजच्या बैठकीत शेतकरी आंदोलन हाताळण्याच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग हे शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी विविध पर्याय घेऊन अमित शहा यांच्याकडे येत असल्याचं बोललं जातंय.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: