सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनात चांदणं दिसतंय: चित्रा वाघ


हायलाइट्स:

  • संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
  • भाजप नेत्यांचे राऊतांना प्रत्युत्तर
  • चित्रा वाघ यांनी साधला निशाणा

मुंबईः ठाकरे सरकारमधील नेत्यांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांबाबत आघाडीतील मंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीका करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही ईडी, सीबीआय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन भाजपवर निशाणा साधला होता. आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी राऊतांवर पलटवार केली आहे.

चित्रा वाघ यांनी एक ट्वीट करत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जैसी करणी, वैसी भरणी, असं म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी व शिवसेनेवर टीका केली आहे.

वाचाः प्रा. शिंदे खून प्रकरणः अखेर सात दिवसांनंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चित्रा वाघ ट्वीटमध्ये म्हणतात. ‘सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते. चुकवलेले लाखो रुपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले. याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे. आता आदळआपट करुन उपयोग नाही. जैसी करणी, वैसी भरणी,’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

वाचाः ‘…आज त्यांच्याच कौतुकाचं तुणतुणं वाजवत फिरण्याची वेळ शिवसेनेवर आली’

‘महाविकास आघाडीला ईडी आणि इनकम टॅक्स विभागाची इतकी भिती का वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनात चांदणं दिसतंय, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणाऱ्या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केला. हे अलीबाबा अन् ४० चोरांचे सरकार… चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल,’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

वाचाः राज ठाकरे अयोध्येला जाणार?; कांचन गिरीजींच्या भेटीमुळं चर्चेला उधाण

काय म्हणाले होते संजय राऊत?

ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोकं आहेत. पाठवा ना. अतिरेकी पळून जातील. ते आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला करता, या तिन्ही चारही संस्था तुम्ही बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा तुम्ही राजकीय गैरवापर केला आहे. जा ना काश्मीरमध्ये पाठवा ना. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. जा म्हणा, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: