‘मला स्वत:चा बेड देऊन तो जमिनीवर झोपला होता’; भारतीय खेळाडूने सांगितले धोनीसोबतचे किस्से


दुबई : भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा टीम इंडियासोबत जोडला गेला आहे. टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी तो मार्गदर्शक म्हणून भारतीय संघासोबत असेल. या दरम्यान हार्दिक पंड्याने धोनीचे खूप कौतुक केले आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा मी कठीण काळातून जात होतो, तेव्हा धोनीने मला मदत केली होती. मला समजून घेणारा तो एकमेव व्यक्ती आहे. असं पंड्याने म्हटलं आहे. महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते, तेव्हा पंड्याला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर धोनीने पंड्याला त्याच्या खोलीत ठेवले होते.

वाचा- भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या युवराजला अटक; पाहा कोणची चूक केली होती

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ‘एमएस हा त्या लोकांपैकी एक आहे, ज्यांनी मला सुरुवातीपासून समजून घेतले. मी कसे काम करू शकतो, मी कोणत्या प्रकारचा माणूस आहे, मला काय आवडत नाही, हे सगळं. जानेवारी २०१९ मध्ये निलंबनानंतर जेव्हा मला न्यूझीलंड दौऱ्यासाठी माझी निवड करण्यात आली, तेव्हा सुरुवातीला मला हॉटेलची रुम मिळाली नव्हती, पण मला फोन आला आणि सांगण्यात आले की, तू फक्त ये. मी असंही पलंगावर झोपत नाही. हार्दिक माझ्या पलंगावर झोपेल आणि मी खाली झोपेल, असं धोनीनं सांगितलं होतं. माझ्यासाठी उभा राहणारा तो पहिला माणूस आहे. तो मला खूप चांगलं ओळखतो. मी त्याच्या खूप जवळ आहे. तो एकमेव व्यक्ती आहे, जो मला शांत करू शकतो. माझ्यासाठी माही नेहमीच माझा भाऊ म्हणून राहिला आहे. जेव्हा जेव्हा मला गरज असते, तेव्हा तो माझ्या पाठीशी उभा राहतो.

वाचा- किंग इज बॅक; कोणाला वाटले नव्हते तो पुन्हा येईल, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

धोनीने वाचवला दंड
हार्दिक पंड्या पुढे म्हणाला की, जेव्हा मी पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेतली, तेव्हा मी जोरदार उत्सव साजरा केला होता. यामुळे मला दंड होण्याचा धोका होता. अशा परिस्थितीत धोनीने माझे सामन्याचे मानधन कापण्यापासून वाचवले होते.

वाचा- या पाच अटी पूर्ण केल्यानंतरच राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

धोनीसोबतच्या नात्याबद्दल हार्दिक म्हणाला, ‘माही भाई प्रेमळ आहे. इतरांसोबत ज्या गोष्टी मी करू शकत नाही, त्या मी त्याच्याबरोबर करू शकतो. आम्ही लगेच एकमेकांशी जोडले जातो. मी कुठल्या परिस्थितीतून आलो आहे, हे त्याला चांगलं माहित आहे. मी त्याला एम.एस. धोनीसारखं वागवत नाही, कदाचित हेच त्याला आवडत असेल.

वाचा- Video: कोण आला रे, कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला

धोनी माझा लाईफ कोच
हार्दिक पंड्या धोनीला त्याचा लाईफ कोच मानतो. तो म्हणाला की, ‘आमच्यात चांगली चर्चा होते. जसं की मी या अगोदर म्हटल्याप्रमाणे, फक्त माही भाईच मला काही गोष्टी समजावून सांगू शकतात. असे बऱ्याचवेळा घडलं आहे. जेव्हा एखादी गोष्टी माझ्या डोक्यात जाते, तेव्हा मग मी त्याला फोन करतो, त्याच्याशी बोलतो आणि सल्ला घेतो. मग तो मला समजावून सांगतो. बर्‍याच गोष्टींमध्ये तो माझा लाईफ कोच आहे. त्याच्यासोबत राहून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतात. तो कधीही त्याचा स्वभाव बदलत नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: