ओपीडीतील उपचारांवर मिळेल विमा ; रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने सादर केली नवी योजना


हायलाइट्स:

  • रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने लाँच केले डिजिटल केअर मॅनेजमेंट, या प्रकारचे पहिलेच ओपीडी प्रोडक्ट
  • टेक-सॅव्ही भारतीयांसाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सने लाँच केली डिजिटल केअर मॅनेजमेंट ओपीडी पॉलिसी
  • निदानापासून ते टेलि-मेडिसीन इत्यादींसाठी उपलब्ध केले संरक्षण

मुंबई :रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीने डिजिटल केअर मॅनेजमेंट हे अशा प्रकारचे पहिलेच ओपीडी प्रोडक्ट सादर केले. बाह्यरुग्ण उपचारांसाठी येणाऱ्या नियमित वैद्यकीय खर्चासाठी पॉलिसीधारकाला संरक्षण उपलब्ध करून देणे हे या प्रोडक्टचे उद्दिष्ट आहे. इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या चौकटीतील मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत एक आदर्श व नवा पायंडा पाडणारी ऑफरिंग म्हणून या प्रोडक्टची निवड करण्यात आली आहे.

तेजीचा धडाका! सेन्सेक्सची ५०० अंकाची झेप, गुंतवणूकदार एक लाख कोटींनी श्रीमंत
कोव्हिड-१९ महामारीमुळे लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिक जागरुक झाले आहेत. त्यामुळे कालानुक्रमे ओपीडी खर्चांमध्येही वाढ झाली आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या खर्चांसाठी सरासरी भारतीय वर्षाला सुमारे ५००० ते १०००० खर्च करू लागला आहे. डिजिटल केअर मॅनेजमेंट पॉलिसीसह अशा स्वतःच्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चांसाठी ग्राहकांना रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे आर्थिक आधार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

एसी रेल्वेपेक्षा विमान प्रवास होणार स्वस्त; आजपासून १०० टक्के आसन क्षमतेने उड्डाणे
या पॉलिसीच्या अंतर्गत अनेक प्रकारचे लाभ मिळतात, ज्यात अमर्यादित फिजिशिअन कन्सल्टेशन, फार्मसी/औषधाचा खर्च, निदान चाचण्यांचा खर्च आणि दातांसाठी व नेत्रचिकित्सेसाठीच्या खर्चांपासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात येते. रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचे ईडी व सीईओ राकेश जैन म्हणाले, “कोव्हिड—१९ च्या परस्थितीत विषाणूच्या भीतीमुळे लोक क्लिनिकमध्ये वा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची भेट घेणे टाळत होते. परिणामी, टेलि-मेडिसीन, ऑनलाइन फार्मसी इत्यादी ओपीडी उपचारांसारख्या डिजिटल पद्धतींचा झपाट्याने प्रसार झाला. त्यामुळे डिजिटल केअर मॅनेजमेंटसारखी ओपीडी पॉलिसी सादर करणे अत्यावश्यक होते, ज्यायोगे नव्या युगातील टेक सॅव्ही भारतीयाला अशा खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चापासून संरक्षण मिळेल, आणि त्यासाठी उपचार पद्धतीची मर्यादा असणार नाही.”

मोठ्या पडझडतीतून सावरले; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने-चांदी
हे प्रोडक्ट खास मध्यम उत्पन्न असलेल्या गटासाठी तयार करण्यात आले आहे, ज्यात विमा पॉलिसीची रक्कम १००० ते ५००० पर्यंत असू शकते आणि १८ ते ७५ या वयोगटातील कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते. त्याचप्रमाणे आरजीआयच्या विद्यमान पॉलिसीधारकांना प्रीमिअमवर ५ टक्के सवलत मिळेल. ज्या ग्राहकांना कोव्हिड-१९ वरील लस घेतली आहे त्यांना अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळेल. ही पॉलिसी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सच्या वेबसाइटवरून थेट खरेदी करता येऊ शकते.

जीडीपीत होणार सुधारणा; ‘डीएसपी’चा टी.आय.जी.ई.आर. फंड गुंतवणुकीसाठी खुला
पॉलिसीचा वापर वेगाने व सुरळीत व्हावा यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्सतर्फे ग्राहकांना कॅशलेस इन-क्लिनिक कन्सल्टेशन, कॅशलेस निदान, कॅशलेस मेडिसीन डिलिव्हरी, भरपाईचा दावा या सर्व पैलूंचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅप उपलब्ध करून देईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: