पैशांची गरज आहे? या दोन बचत योजनांवर मिळेल तुम्हाला कर्ज, जाणून घ्या सविस्तर


हायलाइट्स:

  • सरकारने जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • अल्प बचत योजना भारतीयांसाठी सर्वात लोकप्रिय कर्ज गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे.
  • दीर्घकालीन गुंतवणूकीतून उच्च व्याज दर मिळत नाही, पण जेव्हा पैशांची गरज असते, तेव्हा या योजना उपयोगी पडतात.

नवी दिल्ली : सरकारने यावर्षी जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, १ जुलै २०२१ पासून सुरू होणाऱ्या आणि ३० सप्टेंबर २०२१ रोजी समाप्त होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे राहतील.

मोठ्या पडझडतीतून सावरले; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने-चांदी
कोरोना व्हायरस महामारी दरम्यान मध्यमवर्गीय आणि अल्प बचत योजनांवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हा मोठा दिलासा आहे. अल्प बचत योजना भारतीयांसाठी सर्वात लोकप्रिय कर्ज गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. दीर्घकालीन गुंतवणूकीतून उच्च व्याज दर मिळत नाही, पण जेव्हा आर्थिक आपत्कालीन परिस्थितीसाठी पैशांची गरज असते, तेव्हा या योजना उपयोगी पडतात.

तेजीचा धडाका! सेन्सेक्सची ५०० अंकाची झेप, गुंतवणूकदार एक लाख कोटींनी श्रीमंत
तुम्ही या दोन लहान बचत योजनांवर कर्ज घेऊ शकता –

१) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र –
पाच वर्ष मुदत असलेल्या ही योजन ६.८ टक्के व्याज दर देते. एनएससीमध्ये कमीत कमी एक हजार रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक करू शकता. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक कर कपातीसाठी पात्र असेल. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करू शकता. एनएससीवर दरवर्षी व्याज मिळते, पण ते केवळ मॅच्युरिटीवर देय असते. सध्या एनएससीवर ६.८ टक्के व्याज दर उपलब्ध आहे.

एसी रेल्वेपेक्षा विमान प्रवास होणार स्वस्त; आजपासून १०० टक्के आसन क्षमतेने उड्डाणे
२) किसान विकास पत्र
सध्या किसान विकास पत्र (KVP) मध्ये ६.९ टक्के व्याज दिले जात आहे. या योजनेमध्ये गुंतवलेली रक्कम १० वर्ष ४ महिन्यांत दुप्पट होते. एक गुंतवणूकदार किमान १००० रुपयांची गुंतवणूक करू शकतो. किसान विकास पत्रात गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

इतर अनेक दीर्घकालीन बचत योजनांप्रमाणे, केव्हीपी गुंतवणूकदारांना अकाली पैसे काढण्याची परवानगी देते. तथापि, जर तुम्ही खरेदीच्या एका वर्षाच्या आत प्रमाणपत्र काढले, तर तुमचे फक्त व्याजच कमी होणार नाही, तर तुम्हाला दंडही भरावा लागेल.

जर तुम्ही प्रमाणपत्र खरेदीच्या तारखेपासून एक वर्ष ते अडीच वर्षांच्या दरम्यान पैसे काढले, तर दंड आकारला जाणार नाही, पण तुमचे व्याज कमी होईल. अडीच वर्षांनंतर कोणत्याही वेळी पैसे काढण्याची परवानगी आहे आणि दंड किंवा व्याज कपात नाही.

अल्प बचत योजनांवर कर्ज –
बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटनुसार, जर उर्वरित मॅच्युरिटी कालावधी तीन वर्षांपेक्षा कमी असेल, तर या दोन लहान बचत योजनांच्या मूल्याच्या ८५ टक्के पर्यंत कर्ज मिळू शकते. जर उर्वरित परिपक्वता (रेसिडुअल मॅच्युरिटी) तीन वर्षांपेक्षा जास्त असेल, तर कर्जदार मूल्याच्या ८० टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकतो. एखादी व्यक्ती ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी या सिक्युरिटीज तारण ठेवू शकते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार, या उत्पादनांवरील कर्जासाठी सुमारे ११.९ टक्के व्याज दर आकारला जातो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: