श्रीमती देवकी कलढोणे (दुधाणे) यांची तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड
पंढरपूर /मनोज पवार -पंढरपूर तालुका शिक्षक समितीची व सोलापूर जिल्हा शिक्षक समितीची सहविचार सभा पंढरपूर तालुकाध्यक्ष सुनील कोरे सर यांच्या निवासस्थानी संपन्न झाली. या बैठकीमध्ये पंढरपूर तालुका महिला कार्यकारिणीची खालीलप्रमाणे निवडी आल्या.
तालुकाध्यक्ष – सौ देवकी कलढोणे (दुधाणे)
सरचिटणीस – सौ अर्चना संभूदेव कोळी
उपाध्यक्ष – सौ सुप्रिया आमले ,सौ मंजिरी देशपांडे
कार्याध्यक्ष – सौ अनिता माने
कोषाध्यक्ष – सौ सुवर्णा टकले
सहसरचिटणीस – सौ अनिता तरकसबंद, सौ महानंदा सावंत
प्रसिद्धी प्रमुख – सौ अनिता वेळापूरकर
संपर्क प्रमुख – सौ वासंती रेपाळ ,सौ शुभांगी शिंदे
तालुका संघटक – सौ सारिका फासे ,सौ स्वाती शहाणे ,सौ सुजाता गुरसाळकर,सौ शुभांगी माळी, सौ सुनिता कांबळे
तालुका सल्लागार – सौ संपदा परळीकर ,श्रीमती निता सितापराव,सौ शोभा कोले,सौ सुरेखा उत्पात,सौ शुभांगी कुलकर्णी
निवडी जाहीर करण्यात आल्यानंतर या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. या बैठकीमध्ये राज्य नेते शिक्षक समितीचे सुरेश पवार सर ,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सचिन लादे सरांनी मार्गदर्शन केले.तालुकाध्यक्ष सुनील कोरे सरांनी तालुक्याच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हा सरचिटणीस अमोघसिद्ध कोळी,जिल्हा अध्यक्ष अनिल कादे, सज्जन खडके, आवेश करकमकर, बालाजी शिंदे, रावण मदने, महिला जिल्हा प्रतिनिधी सौ सुरेखा इंगळे, नूतन महिला अध्यक्षा सौ देवकी कलढोणे,संचालिका, सौ स्नेहल आमले, कार्याध्यक्ष सौ अनिता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
सोलापूर जिल्हा महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सौ रजनीताई देशमुख यांनी नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्वश्री उमेश तारापूरकर, पुरुषोत्तम उत्पात, गोवींद कुलकर्णी, रमेश खारे(जिल्हा कोषाध्यक्ष), संतोष कापसे, विजय जाधव, शरद गावडे, ज्ञानेश्वर दुधाणे, रावण मदने, विष्णू नरळे, संतोष कांबळे, आण्णासाहेब रायजादे, राजेंद्र खपाले, सौ संगीता कापसे, सौ वैशाली कोरे, सौ मंगल माने, सौ विजया पवार, सौ निमकर मॅडम,श्रीमती सुनंदा गुळमे मॅडम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस पोपट कापसे सर यांनी केले .आभार चेअरमन दत्तात्रय हेंबाडे सर यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक समितीचे तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी केले.