Gujarat: सूरतमध्ये साड्यांच्या पॅकेजिंग युनिटला आग, दोन मजुरांचा होरपळून मृत्यू


हायलाइट्स:

  • सोमवारी पहाटे पॅकेजिंग युनिटला भीषण आग
  • तब्बल १२४ हून अधिक जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं
  • अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी हायड्रोलिक क्रेनचा वापर

सूरत : गुजरातच्या सूरत जिल्ह्यात सोमवारी सकाळी एका पाच मजली इमारतीला आग लागून मोठी दुर्घटना घडलीय. या इमारतीत कार्यरत असलेल्या ‘पॅकेजिंग युनिट‘ला भीषण आग लागल्यानंतर एकच हाहाकार उडाला. इमारतीत काम करणाऱ्या दोन मजुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडोडोरा औद्योगिक क्षेत्रातील या युनिटमधून तब्बल १२४ हून अधिक जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्यानं त्यांचे प्राण बचावले आहेत.

India Nepal: भारतीय हद्दीत नेपाळी विमान दाखल, ४०० मीटरपर्यंत आत घुसून माघारी परतलं
IMD Alert: केरळ, दिल्ली, उत्तराखंडात पावसाचा धुमाकूळ; सतर्कतेचा इशारा

कडोडोराचे पोलीस निरीक्षक हेमंत पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वीवा पॅकेजिंग कंपनीमध्ये पहाटे जवळपास ४.३० च्या सुमारास आग लागल्यानं ही दुर्घटना घडली. पहिल्या मजल्यावर लागलेली ही आग अगदी काही वेळातच इतर मजल्यांवरही पसरली.

इमारतीत अडकून पडलेल्या श्रमिकांना बाहेर काढण्यासाठी हायड्रोलिक क्रेनचा वापर करण्यात आला. अद्याप आगीचं कारण समजू शकलेलं नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जखमींना सूरतच्या स्मीमेर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

इमारतीतील ज्या युनिटमध्ये ही आग लागली त्यात साडी पॅकिंग, बॅग आणि मास्क बनवण्याचं काम सुरू होतं. या युनिटचं नाव ‘चिरायु पॅकेजिंग मिल’ असं आहे.

देशभरात शेतकऱ्यांचा रेल रोको : लखनऊमध्ये कलम १४४ लागू
capt jayant joshi : अखेर ७५ दिवसांनी सापडला पायलट जयंत जोशींचा मृतदेह; लष्कर, नौदलाचे अथक प्रयत्न कामी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: