‘काश्मीरमध्ये दहशतवाद वाढलाय; ईडी, CBI आणि किरीट सोमय्यांना तिकडं पाठवा’


हायलाइट्स:

  • जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून शिवसेनेची केंद्रावर टीका
  • ईडी, सीबीआय व एनसीबीला काश्मीरमध्ये पाठवा – राऊत
  • किरीट सोमय्यांनाही काश्मीरात पाठवा, कागदपत्रे देतो – राऊत

मुंबई: महाविकास आघाडीचे नेते व सरकारमधील मंत्र्यांवर होत असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. ‘जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद वाढलाय. तिथं लोकांवर अन्याय, अत्याचार होतोय. महाराष्ट्र सरकारवर आरोप करणारे किरीट सोमय्यांसारखे भाजपचे नेते व त्यांच्या आरोपानंतर छापेमारी करणाऱ्या ईडी (ED), सीबीआय (CBI) व एनसीबीला (NCB) जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा,’ असं आव्हान संजय राऊत यांनी केलं आहे.

वाचा: भाजपविरोधात फक्त शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांनी बोलायचं का?; आघाडीच्या मंत्र्यांवर राऊत संतापले

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडलीय. ३७० कलम हटवूनही जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. काश्मिरी पंडित, शीख नागरिक व बिहारी मजुरांचे खून पडत आहेत. या घटनांची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. चीन हा लडाख आणि तावांगमध्ये घुसला आहे. नुसत्या धमक्यांची भाषा करून हे थांबणार नाही. चीनवरही सर्जिकल स्ट्राइक करायला हवा. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावर भूमिका मांडायला हवी,’ असं राऊत म्हणाले.

वाचा: ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर भयंकर अपघात; सहा वाहने एकमेकांना धडकली, ३ ठार

ईडी, सीबीआय, एनसीबी व इन्कम टॅक्स या चारही संस्था केंद्र सरकारनं बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा वापर भाजपविरोधी राज्यांमध्ये केला जातोय. या संस्था प्रचंड पावरफुल झाल्या आहेत. त्यांना काश्मीरमध्ये पाठवा. दहशतवादी पळून जातील. किरीट सोमय्यांनाही पाठवा, आम्ही त्यांना दहशतवाद्यांच्या ठावठिकाण्याची माहिती आणि कागदपत्रे देऊ. फिरू द्या त्यांना जम्मू, काश्मीर, अनंतनाग आणि बारामुल्लामध्ये. तिथं जाऊन दहशतवाद्यांना दम द्या, आम्हाला इथं शहाणपण शिकवू नका,’ असंही राऊत यांनी सुनावलं.

वाचा: मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सिंहगड एक्सप्रेस पुन्हा सुरूSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: