रशियाच्या हद्दीत अमेरिकी बॉम्बर; रशियाने पाठवले मिग-३१ लढाऊ विमाने


मॉस्को: अमेरिका आणि रशियातील तणाव निवळण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेच्या बॉम्बर बी-१ विमानाने जपान समुद्रातील हद्दीत घुसखोरी केली असल्याचा दावा रशियाने केला. या बॉम्बर विमानाला हुसकावण्यासाठी रशियाने मिग-३१ लढाऊ विमान पाठवले. रविवारी ही घटना घडली.

रशियन वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपूर्वी या भागात अमेरिकन नौदल आणि रशिया समोरासमोर उभे ठाकले होते. शुक्रवारी रशियाने एक अमेरिकन युद्धनौकेने रशियाच्या समुद्र हद्दीत प्रवेश केला असल्याचा आरोप केला होता. या दरम्यान रशिया आणि अमेरिकन नौदलाकडून या भागात युद्धसराव सुरू होता.

अमेरिकेने रशियाचा हा दावा फेटाळून लावला होता. रशियन संरक्षण मंत्रालयाने याचा एक व्हिडिओ ही प्रसिद्ध केला होता. आतापर्यंत अमेरिका आणि रशिया दरम्यान काळा समुद्राच्या हद्दीत तणाव दिसत होता. आता पॅसिफिक महासागरातही दोन्ही देशांच्या नौदलात तणाव दिसू लागला आहे.

दोन्ही देशांच्या युद्धनौकेत ६० मीटरचे अंतर

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, रशियाच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या अमेरिकन युद्धनौकेला माघारी जाण्यासाठी इशारा देण्यात आला होता. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने रशियन युद्धनौकेला अमेरिकन युद्धनौकेच्या जवळ जावे लागले. या दरम्यान, दोन्ही युद्धनौकेदरम्यानचे अंतर ६० मीटरपेक्षाही कमी होते. रशियाच्या या आक्रमक भूमिकेनंतर अमेरिकन युद्धनौकेने मार्ग बदलत माघारी गेले असल्याचे रशियाने म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: