हायलाइट्स:
- तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सोमवारी बाजार सुरू झाला.
- सेन्सेक्सने ५०० अंकांची झेप घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६० अंकाची वाढ झाली.
- निर्देशांकांच्या या तेजीने आज गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत किमान एक लाख कोटींची भर पडली आहे.
एसी रेल्वेपेक्षा विमान प्रवास होणार स्वस्त; आजपासून १०० टक्के आसन क्षमतेने उड्डाणे
आजच्या सत्रात धातू, बँका, एफएमसीजी क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला.एसबीआय , एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन ऑइल, टायटन, फेडरल बँक, या शेअरमध्ये ५२ आठवड्याच्या उच्चांक गाठला आहे. त्याचबरोबर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, हिंदाल्को, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, ग्रासीम, आयटीसी, डिव्हीज लॅब , सन फार्मा या शेअरमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. तसेच नेस्ले, मारुती, एअरटेल या शेअरमध्ये १ टक्का वाढ झाली आहे.
मोठ्या पडझडतीतून सावरले; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने-चांदी
सेन्सेक्स मंचावर ३० पैकी २५ शेअर तेजीत आहेत. तर बजाज ऑटो, एशियन पेंट्स, डॉ. रेड्डी लॅब, एचडीएफसी, टेक महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली आहे. त्याचबरोबर पीएनबी हौसिंग फायनान्सच्या शेअरमध्ये ५ टक्के घसरण झाली आहे.
चूक सुधारण्याची संधी ; या कारणामुळे इक्विटी फंडात गुंतवणूकदारांचे अडकलेत २ लाख कोटी
एसबीआयच्या शेअरने पहिल्यांदाच ५०० रुपयांची पातळी ओलांडली आहे. सध्या निफ्टी १६२ अंकांच्या वाढीसह १८५०० वर आहे. सेन्सेक्स ४९७ अंकांनी वधारून ६१७७५ अंकावर ट्रेड करत आहे. आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये प्रत्येकी १ टक्का वाढ झाली आहे.
पेट्रोल-डिझेल ; चार दिवस दरवाढ केल्यांनतर कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार गुरुवरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात १६८२ कोटींची खरेदी केली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र १७५० कोटीची विक्री केली होती.
भाव कमी, खरेदी जोरात ; सहामाहीत सोने आयात तब्बल चार पटीने वाढली
गेल्या आठवड्यात गुरुवारी सेन्सेक्स ०.९४ टक्क्यांनी वधारून ६१३०५ अंकावर बंद झाला होता. निफ्टी ०.९७ टक्क्यांनी वधारून १८३३८.५५ अंकावर स्थिरावला होता. रुपयात डॉलरच्या तुलनेत ११ पैशांची वाढ झाली आणि तो ७५.२६ वर स्थिरावला. शुक्रवारी विजय दशमीनिमित्त भांडवली बाजार बंद होते. शुक्रवारी अमेरिकेतील भांडवली बाजारात तेजी दिसून आली होती.