अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार, लष्करी अधिकारी अटकेत


हायलाइट्स:

  • अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर
  • लष्करी अधिकाऱ्यांकडून अमानुष कृत्य
  • पोलिसांनी केली अधिकाऱ्याला अटक

अहमदनगरः एका अल्पवयीन मुलाला झुडपांत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सुखदेवरामा गणेशरामा (वय ४५, मूळ रा. नागोरी, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. तो लष्करात ज्युनिअर ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. न्यायालयाने त्याला २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. आरोपी लष्करी गणवेशात होता, एवढीच माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या आधारे नगर पोलिसांनी चिकाटीने तपास करून लष्करी प्रशासनासमोर पुरावे सादर केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

नगरच्या सावेडी उपनगरात चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. त्या दिवशी सायंकाळी एक तेरा वर्षांचा मुलगा सायकलवरून जात होता. त्यावेळी लष्करी गणवेशातील एक व्यक्ती त्याला भेटली. त्याला थांबवून येथे लघुशंका करण्याची जागा कोठे आहे, असे विचारून त्याला रस्त्याच्या बाजूला झुडपात ओढत नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आणि कोणाला सांगू नको, अशी धमकी देऊन निघून गेला. मुलाने घरी आल्यानंतर आपल्या पालकांना याची माहिती दिली. त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. आरोपीने लष्करी गणवेश घातला असल्याची माहिती मुलाने पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली.

वाचाः चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख; शिवसेना म्हणते…

या भागातून लष्करी वाहने जात असतात. शिवाय नादुरूस्त झालेली वाहनेही येथे दुरूस्त केली जातात. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पुरावे शोधण्यास सुरवात केली. या भागातून अनेक ठिकाणावरून सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात आले. त्यातून ठोस माहिती पोलिसांना मिळाली. त्या दिवशी लष्कराची एक गाडी या भागात दुरूस्तीसाठी आली होती. त्यासोबत चार-पाच जवान व हा आरोपी अधिकारीही असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ही सर्व माहिती घेऊन लष्करी प्रशासनाशी संपर्क साधला. प्रशासनाने पुरावे पाहून आरोपी सुखदेवरामा याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

वाचाः बेपत्ता तरुणाच्या हत्येचा अखेर उलगडा; महिलेसह तिघांना अटक

चार दिवसांत पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. घटनेच्या दिवशी आरोपी सुखदेवरामा आपल्या सहकाऱ्यांसोबत तेथे गेलेला होता. तसे जबाबही त्याच्यासोबत असलेल्या जावानांचे नोंदविण्यात आले आहेत. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. लष्करी अधिकाऱ्याकडून तेही लष्करी गणवेशात कामावर असताना हे घाणेरडे कृत्य केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वाचाः भाजपा नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावेच लागेल; शिवसेनेचा खोचक टोलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: