राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, २ दिवसांत होईल तापमानात वाढ


| Maharashtra Times | Updated: Oct 17, 2021, 1:57 PM

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागानं पुढील ४८ तासांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा दिला आहे.

 

राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, २ दिवसांत होईल तापमानात वाढ

हायलाइट्स:

  • राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
  • २ दिवसांत होईल तापमानात वाढ
  • महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी आज यलो अॅलर्ट

मुंबई : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला असून, अनेक ठिकाणी ‘ऑक्टोबर हीट’ जाणवत आहे. मात्र, पुढील ४८ तासांत अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. हवामान विभागानं पुढील ४८ तासांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल, असा इशारा दिलाय. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी आज यलो अॅलर्ट जारी केलाय.

मराठवाडा विदर्भ आणि मध्य प्रमाण महाराष्ट्रात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. शनिवारी देखील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपाऊस झाला. अमरावतीमध्ये मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. खरंतर दोन दिवसात राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्यानं दिवसाच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
‘मी लहानच आहे पण…’, मोठ्या नेत्या नाहीत म्हणणाऱ्या पवारांना पंकजा मुंडेंचं चोख प्रत्युत्तर
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये परभणी, विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, ब्रह्मपुरी आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आजही या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी आणि धान्याची काळजी घ्यावी अशा सुचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : heavy rains expected in marathwada and vidarbha temperature rise in 2 days
Marathi News from Maharashtra Times, TIL NetworkSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: