राज्यात कांदा पुन्हा रडवणार, दिवाळीपर्यंत भाव वाढणार; वाचा काय असेल नवा दर?


हायलाइट्स:

  • नवीन कांदा बाजारात येईपर्यंत किमती आणखी वाढणार…
  • महाराष्ट्राच्या विविध भागात कांद्याचा पुरवठा विस्कळीत
  • कांद्याचे भाव अचानक वाढण्याचे कारण काय?

मुंबई : परतीच्या पावसामुळे नवीन कांदा पिकांचे खूप नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत इतर राज्यांच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमा केलेल्या जुन्या कांद्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांद्याला ५० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या मते नवीन कांदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटकात परतलेल्या मान्सूनच्या पावसामुळे कांद्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीच्या मान्सूनच्या पावसाने कहर केला आहे. पावसात नुकसान झालेल्या पिकामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. नवीन कांदा पीक नोव्हेंबरमध्ये तयार होईल. अशा परिस्थितीत दिवाळीपर्यंत कांद्याचे भाव अशाच प्रकारे वाढत राहतील.

नवीन कांदा बाजारात येईपर्यंत किमती आणखी वाढणार…

महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांदा मुबलक आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत येथील शेतकरी कांद्याचा पुरवठा करू शकत नाहीत. यामुळे साठवलेल्या जुन्या कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांदा ५० ते ६० रुपये किलो मिळत आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये १०० ते १३० वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. येथे ३० ते ४५ रुपये प्रति किलो दराने कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाण्याच्या किरकोळ बाजारात हा कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकला जात आहे.

Breaking : नांदेड निवडणुकांच्या आधीच भाजपला मोठं खिंडार, बड्या नेत्याची राजीनामा देत काँग्रेस प्रवेशाची घोषणा
महाराष्ट्राच्या विविध भागात कांद्याचा पुरवठा विस्कळीत

पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, शिरूर, जुन्नर आणि नाशिक, संगमनेर, अहमदनगर येथील शेतकरी कांद्याचा मोठा साठा ठेवतात. पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये दररोज सुमारे ५० वाहनांमध्ये कांद्याची मागणी केली जाते. नाशिकच्या लासलगाव बाजारात सुमारे आठ ते दहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती समोर येत आहे. लासलगाव बाजार समितीने ही माहिती दिली आहे.

कांद्याचे भाव अचानक वाढण्याचे कारण काय?

सध्या नवीन कांदा बाजारात उपलब्ध नाही. महाराष्ट्राच्या जुन्या कांद्याला देशभरात सर्वाधिक मागणी आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे नवीन कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे पुढील काही दिवस कांदा स्वस्त होण्याची आशा नगण्य आहे.

‘अजित पवारांच्या बेनामी संपत्तीत बहिणी आणि मेव्हण्यांचाही हिस्सा’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: